मुंबई, 28 मे : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो रेट (Repo Rate) आणि सीआरआरमध्ये वाढ केल्याने एकीकडे कर्ज महाग झाले आहे, तर दुसरीकडे मुदत ठेवी करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सर्व बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. याआधीही बँकांनी यावर्षी जानेवारीपासून एफडी (Fixed Deposit) व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मे महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळू लागले आहे. येत्या काही महिन्यांत व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतील. जर तुम्हीही वाढलेल्या व्याजदराचा फायदा घेण्याचा विचार करत असाल आणि FD करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग? रिझर्व्ह बँकेने एफडीचे नियम बदलले रिझर्व्ह बँकेने एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी एफडी घेण्यापूर्वी बदललेल्या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागेल. जरी तुम्ही आधीच FD केली असेल आणि ती मॅच्युअर झाली नसेल, तरी तुमच्यासाठी नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नवीन नियमानुसार, जर तुम्ही एफडीच्या मॅच्युरिटी रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. तुम्हाला किती व्याज मिळेल? आता जर तुम्ही FD पूर्ण झाल्यानंतर पैसे काढले नाहीत, तर त्या FD वर बँकेने तुम्हाला दिलेले व्याज मिळणार नाही. त्या एफडीच्या व्याजदराऐवजी बँक मॅच्युरिटीच्या वेळी बचत खात्यावर जे व्याज देत आहे, तेच व्याज तुम्हाला मिळेल. त्यामुळे आता मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढणे तुमच्यासाठी चांगले होईल. बँक खातं वापरात नसेल तर लवकर बंद करा, अन्यथा होईल नुकसान; फसवणुकीचाही धोका याआधी ज्या ग्राहकांनी मुदतपूर्तीनंतर एफडीमधून पैसे काढले नाहीत त्यांना बँका एफडीच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज देत असत. यामुळे एफडी गुंतवणूकदारांनी जास्त व्याज मिळण्यासाठी मुदतपूर्तीनंतरही पैसे काढले नाहीत. रिझर्व्ह बँकेने आता यावर बंदी घातली असून नवा नियम लागू केला आहे. RBI चे हे नवीन नियम सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमध्ये केलेल्या FD ला समान प्रमाणात लागू झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.