जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोने दर 48 हजारांवर, तर चांदीही महागली; वाचा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दर 48 हजारांवर, तर चांदीही महागली; वाचा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दर 48 हजारांवर, तर चांदीही महागली; वाचा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

सोने दरात मागील तीन आठवड्यांपासून तेजी आहे. सद्य परिस्थितीत गुंतवणुकदारांच्या खरेदीमुळे दर तेजीत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 मे : भारतीय सराफा बाजारात आज 24 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) तेजी नोंदवण्यात आली असून सोन्याचा भाव 48000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज वाढीची नोंद झाली. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 71,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात वाढ झाली, तर चांदीच्या किंमती स्थिर होत्या. सोन्याचे नवे दर (Gold Price, 24 May 2021) - दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 95 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारला. आजच्या वाढीमुळे सोन्याचा दर 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव 48,015 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात भाव 47,920 इतका होता. चांदीचा नवा दर (Silver Price, 24 May 2021) - चांदीचा दरही आज वधारला आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव आज 154 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा दर 70,998 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा दर 70,844 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा -  तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल )

सोने-चांदी दरात वाढ का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात मागील तीन आठवड्यांपासून तेजी आहे. सद्य परिस्थितीत गुंतवणुकदारांच्या खरेदीमुळे दर तेजीत आहे. तसंच, सोनं सध्या डॉलरच्या कमजोरीमुळे, चार महिन्यांच्या उच्चांकी दरावर आहे. मोतीलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी, कमकुवत डॉलर आणि अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या कमीमुळे गुंतवणुकदार सोने खरेदीकडे वळले असल्यानेही सोने दरात वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात