मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका सुरूच! मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका सुरूच! मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today on 29 June 2021: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत आज 29 पैशांची वाढ केली आहे तर डिझेलचे दर 24 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत

Petrol-Diesel Price Today on 29 June 2021: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत आज 29 पैशांची वाढ केली आहे तर डिझेलचे दर 24 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत

Petrol-Diesel Price Today on 29 June 2021: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत आज 29 पैशांची वाढ केली आहे तर डिझेलचे दर 24 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत

नवी दिल्ली, 29 जून: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude oil price) सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातील इंधनावर देखील पाहायला मिळतो आहे. एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today on 29 June 2021) वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत आज 29 पैशांची वाढ केली आहे तर डिझेलचे दर 24 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. या वाढीनंतर मुंबईतील पेट्रोलचे दर 104.90 रुपये आणि डिझेलचे दर 96.72 रुपये प्रति लीटर झाले आहेत.

4 मे पासून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. रोज थोड्या-थोड्या फरकाने होणाऱ्या वाढीमुळे अनेक शहरात पेट्रोलचे दर 100 च्या पार तर काही शहरात 105 रुपयांपेक्षा जास्त आहेत. यामध्ये जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाडा, इंदूर, जयपूर, भोपाळ, ग्‍वालियार, गुंटूर, ककिनाडा, चिकमंगलूर, शिवमोगा, मुंबई, रत्‍नागिरी, औरंगाबाद, पाटणा इ. या शहरांचा समावेश आहे.

हे वाचा-महत्त्वाची बातमी! या बँकेतील ग्राहकांनी जाणून घ्या नवा IFSC Code अन्यथा...

रोज बदलतात इंधनाचे दर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

29 जून रोजी पेट्रोलचे नवे दर (Petrol-Diesel Price on 29 June 2021)

>> दिल्ली - पेट्रोल 98.81 रुपये आणि डिझेल 89.91 रुपये प्रति लीटर

>> मुंबई - पेट्रोल 104.90 रुपये आणि डिझेल 96.72 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई - पेट्रोल 99.80 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता - पेट्रोल 98.64 रुपये आणि डिझेल 92.03 रुपये प्रति लीटर

>> जयपूर - पेट्रोल 105.54 रुपये आणि डिझेल 98.29 रुपये प्रति लीटर

>> लखनऊ - पेट्रोल 95.97 रुपये आणि डिझेल 89.59 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ - पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 97.93 रुपये प्रति लीटर

>> पाटणा- पेट्रोल 100.81 रुपये आणि डिझेल 94.52 रुपये प्रति लीटर

हे वाचा-Gold price today: काय आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव? पाहा मुंबईतील आजचा दर

कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike