• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • महत्त्वाची बातमी! या बँकेतील ग्राहकांनी जाणून घ्या त्यांचा नवा IFSC Code, अन्यथा बँकिंगमध्ये येतील समस्या

महत्त्वाची बातमी! या बँकेतील ग्राहकांनी जाणून घ्या त्यांचा नवा IFSC Code, अन्यथा बँकिंगमध्ये येतील समस्या

देशातील एक महत्त्वाची बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) नवीन IFSC कोड (New IFSC Code) जारी केले आहेत. तुम्ही घरबसल्या नवीन कोड माहित करून घेऊ शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जून: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या बँकेमध्ये खातं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून नवीन आयएफएससी कोड (New IFSC Code) जारी करण्यात आले आहेत. तुम्ही घरबसल्या या नवीन कोडबाबत माहिती करून घेऊ शकता. बँक विलिनीकरणानंतर कोड्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बँकेकडून अशी सवलत देण्यात आली होती की तुम्ही जुना कोड वापरू शकता, मात्र 1 जुलैपासून तुमचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत. 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँकेचं विलिनीकरणार बँक ऑफ बडोदामध्ये झालं होतं, ज्यानंतर या कोडमध्ये बदल करण्यात आले होते. 30 जूननंतर देना आणि विजया बँकेच्या ग्राहकांचे कोड काम करणार नाहीत. तुम्ही 1 जुलैपासून जुन्या कोडचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. जाणून घ्या कशाप्रकारे माहित करून घ्याल तुमचा नवा कोड- कसा माहित करून घ्याल तुमचा नवीन IFSC Code -तुम्ही ब्रँचमध्ये जाऊन नवीन  IFSC Code माहित करू शकता -बँकेकडून पाठवण्यात आलेलं लेटर किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्ही नवीन कोड माहित करून घेऊ शकता हे वाचा-पुण्याची मराठी मुलगी झाली अब्जाधीश; स्वकर्तृत्वार अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल -याशिवाय तुम्ही टोल फ्री क्रमांक 18002584455/18001024455 यावर देखील कॉल करून माहित करून घेऊ शकता -याशिवाय तुम्ही SMS च्या माध्यमातून देखील नवीन आयएफसी कोडबाबत माहिती करून घेऊ शकता. एसएमएसच्या माध्यमातून अशाप्रकारे माहित करून घ्या एसएमएसच्या माध्यमातून आयएफएससी कोड माहित करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन MIGR <Space> अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक 8422009988 या क्रमांकावर पाठवावे लागतील. अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने आयएफसी कोड माहित करून घेऊ शकता. ऑफिशिअल लिंकच्या माध्यमातून तुम्ही https://www.bankofbaroda.in/amalgamation-migration.html या ऑफिशिअल लिंकच्या माध्यमातून आयएफएससी कोडबाबत माहित करून घेऊ शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: