मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबरमध्ये 18 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा भडकलं पेट्रोल-डिझेल

Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबरमध्ये 18 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा भडकलं पेट्रोल-डिझेल

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 5.15 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेल दर सतत वाढतो आहे.

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 5.15 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेल दर सतत वाढतो आहे.

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 5.15 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेल दर सतत वाढतो आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. आज रविवारीही इंधन दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल 30 ते 35 पैशांची वाढलं आहे. तर डिझेल 34 ते 38 पैशांनी महागलं आहे. 30-30 पैसे वाढून आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 5 रुपयांहून अधिक महागलं आहे. दिल्लीत पेट्रोल दर 107.59 रुपये, तर डिझेल दर 96.32 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती 113.46 रुपये आणि डिझेल 104.38 रुपये प्रति लीटर आहे. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढलं पेट्रोल-डिझेल - ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 18 हून अधिक वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ तीन दिवस सोडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहे. केवळ ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 5.15 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेल दर सतत वाढतो आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल रेट 120 लीटर जवळपास पोहोचला आहे. चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 24 October 2021) - >> दिल्ली पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 96.32 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 113.46 रुपये आणि डिझेल 104.38 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 104.52 रुपये आणि डिझेल 100.59 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 108.11 रुपये आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लीटर

खरेदी करता येईल खिशाला परवडणारं स्वत:चं घर, PNB देत आहे संधी

देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
First published:

Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price hike

पुढील बातम्या