• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढ सुरुच, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव

Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढ सुरुच, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव

आज पेट्रोल दरात 35 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ (Petrol diesel price hike) सतत सुरुच आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल दरात (Petrol-Diesel Price) वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल दरात 35 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 105.14 रुपये, तर डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल 34 पैसे प्रति लीटर महागलं आहे. तर डिझेल दरात 37 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरात या महिन्यात जवळपास दररोज वाढ झाली आहे. या महिन्यात केवळ 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी महागलं आहे, तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ झाली आहे. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price on 16 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 105.49 रुपये आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 111.43 रुपये आणि डिझेल 102.15 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 98.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 97.33 रुपये प्रति लीटर

    टॅलेंटच्या शोधात आयटी कंपन्या! 1 लाखांपेक्षा अधिक जणांना देणार नोकऱ्या

    देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

    LIC Mutual Fund मधून पैसे कमावण्याची संधी, फक्त 15 दिवस सुरू राहणार LICचा हा फंड

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: