Home /News /money /

Petrol Price Today: सर्वसामान्यांना फटका, सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Petrol Price Today: सर्वसामान्यांना फटका, सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

भारतीय तेल कंपन्यांनी आज मंगळवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol diesel price hike) केली आहे.

    नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : भारतीय तेल कंपन्यांनी आज मंगळवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol diesel price hike) केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढवले आहेत. तर डिझेल दरात आज 30 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोल 102.64 रुपये आणि डिझेल 91.07 रुपये प्रति लीटर झालं आहे. चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 5 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 102.64 रुपये आणि डिझेल 91.07 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 108.67 रुपये आणि डिझेल 98.80 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 100.23 रुपये आणि डिझेल 95.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 103.36 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर सध्या जवळपास 26 राज्यात पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे. CNG-PNG चीही दरवाढ - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत.

    महागाईची DOUBLE CENTURY! पेट्रोलनंतर डिझेलचंही शतक

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या