मराठी बातम्या /बातम्या /देश /

महागाईची DOUBLE CENTURY! पेट्रोलनंतर डिझेलचंही शतक, या राज्यात किंमतींने ओलांडला 100 चा टप्पा

महागाईची DOUBLE CENTURY! पेट्रोलनंतर डिझेलचंही शतक, या राज्यात किंमतींने ओलांडला 100 चा टप्पा

Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today

भारतात पेट्रोलच्या किंमतीं नवनवे विक्रम प्रस्थापित करत (Diesel prices cross 100 mark) असताना डिझेलनंदेखील आपलं शतक पूर्ण केलं आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 4 ऑक्टोबर : भारतात पेट्रोलच्या किंमतीं नवनवे विक्रम प्रस्थापित करत (Diesel prices cross 100 mark) असताना डिझेलनंदेखील आपलं शतक पूर्ण केलं आहे. देशातील एका राज्यामध्ये (Diesel price cross 100 in Rajasthan) डिझेलच्या किंमतींनी 100 चा टप्पा पार केला असून इतर राज्यांमध्ये ते शंभरीच्या जवळ आहे. सर्वसामान्यांचं बजेट यामुळे पुरतं (Impact on common man’s budget) कोलमडून पडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या असून आता या दोन्ही इंधनांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं चित्र आहे.

या राज्यात डिझेलचं शतक

राजस्थानमध्ये सध्या देशातील सर्वात महाग डिझेल मिळत असून एक लिटर डिझेलसाठी 100.10 रुपये मोजावे लागत आहेत. जयपूरमध्ये सोमवारी डिझेलच्या दरात नवा विक्रम नोंदवण्यात आला असून ते शंभरीच्य वर पोहोचलं आहे. राजस्थान पेट्रोलिअम असोशिएशननं दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील डिझेलचे दर शंभरच्या पार पोहोचले आहेत. तर राजस्थानच्या सीमावर्ती भागातील दर हे जयपूरच्या तुलनेत अधिक आहेत. याचाच अर्थ राजस्थानच्या इतर भागातदेखील डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे.

इतर शहरांत शंभरीच्या उंबरठ्यावर

देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरच्या पार पोहोचल्या असून डिझेलच्या किंमती नव्वदीत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.39 रुपये तर डिझेलचा दर 90.77 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 108.43 रुपये तर डिझेलच्या एका लिटरसाठी 98.48 रुपये मोजावे लागत आहेत.

हे वाचा - नात्याला काळीमा! मित्राकडून 500 रुपये घेऊन दिली पत्नीवर बलात्काराची परवानगी

चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई – पेट्रोल 108.43, डिझेल 98.48

दिल्ली – पेट्रोल 102.39, डिझेल 90.77

चेन्नई – पेट्रोल 100.01, डिझेल 95.31

कोलकाता – पेट्रोल 103.07, डिझेल 93.87

CNG-PNG चीही दरवाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price