Home /News /money /

Petrol Diesel Prices today: मागील 10 दिवसांत पेट्रोल 7 रुपयांनी महाग, आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढ

Petrol Diesel Prices today: मागील 10 दिवसांत पेट्रोल 7 रुपयांनी महाग, आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढ

जवळपास 10 ते 15 दिवसांपासून इंधन (Petrol-Diesel Price Hike) दर सतत वाढता आहे. यादरम्यान दररोज जवळपास 80 पैशांची वाढ होत आहे.

    नवी दिल्ली, 2 एप्रिल : पेट्रोल-डिझेल दरात आज शनिवारीही 80 पैशांची वाढ (Petrol-Diesel Price Today) झाली आहे. मागील चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर होता. परंतु जवळपास 10 ते 15 दिवसांपासून इंधन (Petrol-Diesel Price Hike) दर सतत वाढता आहे. यादरम्यान दररोज जवळपास 80 पैशांची वाढ होत आहे. काल शुक्रवारी रेट स्थिर होते. आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी मागील 10 दिवसांत पेट्रोल दरात 7 रुपयांहून अधिक वाढ केली आहे. तर डिझेल दरही जवळपास याच दराने वाढला आहे. मुंबईत पेट्रोल 118 रुपये लीटरजवळ पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर 100 रुपयांवर आहे.

    हे वाचा - सामान्यांच्या खिशाला चाप! National Highway वर टोल टॅक्स वाढल्याने आजपासून किती मोजावी लागणार रक्कम?

    चार महानगरातील पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 117.57 रुपये आणि डिझेल 101.79 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 108.21 रुपये आणि डिझेल 98.28 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 112.19 रुपये आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लीटर आहे. असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - Multibagger Share: TATA च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या