Home /News /money /

Petrol Price Today: आज काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? 70 हून अधिक दिवस इंधनाचे भाव स्थिर

Petrol Price Today: आज काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? 70 हून अधिक दिवस इंधनाचे भाव स्थिर

Petrol-Price Today: याआधी गेल्यावर्षीच्या दिवाळीदरम्यान केंद्र सरकारने आणि काही राज्य सरकारांनी इंधनावरील एक्साइज आणि वॅट दरात कपात केली होती. या कपातीनंतर देशभरातील विविध राज्यात 10 रुपये ते 17 रुपयांपर्यंत घसरण पाहायला मिळाली होती.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 जानेवारी: तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की गेल्या 70 हून अधिक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल झालेला नाही. वेगवेगळ्या शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील किरकोळ बदल वगळता देशातील महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.  याआधी गेल्यावर्षीच्या दिवाळीदरम्यान केंद्र सरकारने आणि काही राज्य सरकारांनी इंधनावरील एक्साइज आणि वॅट दरात कपात केली होती. या कपातीनंतर देशभरातील विविध राज्यात 10 रुपये ते 17 रुपयांपर्यंत घसरण पाहायला मिळाली होती. दिवाळीनंतर (Fuel Price Today) इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. सरकारचे असे म्हणणे असते की पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणारी वाढ त्यांच्या हातात नसते. पेट्रोल-डिझेलचे दर तेल कंपन्या प्रतिदिवसाच्या हिशोबाने निश्चित करतात. परंतू सध्या अशी चर्चा आहे की आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेता सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा-विश्वास बसणार नाही! असे फोटो विकून तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी शनिवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Today 15th January 2022) दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. राज्यातील इंधनाचा भाव मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर किरकोळ बदलले आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.45 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.25 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 109.45 रुपये 92.25 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 109.49 रुपये 92.29 रुपये
    नागपूर 109.71 रुपये 92.53 रुपये
    अहमदनगर 110.15 रुपये 92.92 रुपये
    औरंगाबाद 110.38 रुपये 93.14 रुपये
    रत्नागिरी 110.97 रुपये 93.68 रुपये
    रायगड 109.48 रुपये 92.25 रुपये
    परभणी 112.49 रुपये 95.17 रुपये
    पालघर 109.75 रुपये 92.51 रुपये
    सांगली 110.03 रुपये 92.83 रुपये
    कोल्हापूर 110.09 रुपये 92.89 रुपये
    असे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-Star Health ची नवी सेवा, आता Whatsapp वर क्लेम करा पॉलिसी; चेक करा डिटेल्स सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या