जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल?

Petrol Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल?

Petrol Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल?

बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. सोमवारीही दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) प्रति बॅर 120 डॉलरच्या आसपास आहे. जागतिक परिस्थितीत बदल किंवा सुधारणा न झाल्यास क्रूड आणखी महाग होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महागड्या क्रूडमुळे भाव वाढण्याचा धोका आहे.

जाहिरात

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 109.27 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे. रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. तुम्ही आजची नवीन किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check Petrol-Diesel Price Daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात