मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले, मात्र आजही त्यांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 जून : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आज ब्रेंट क्रूडची किंमत (Crude Oil Price) प्रति बॅरल 119 डॉलरच्या खाली आली आहे.

अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल118.9 डॉलरवर आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले, मात्र आजही त्यांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

>> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

>> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर

>> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर

>> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर

>> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर

>> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर

>> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

>> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर

Financial Tips: CIBIL स्कोअर कमी आहेत? तरीही लोन घेण्यासाठी काय कराल?

दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

शेअर बाजारात सुरु असलेल्या पडझडीत गुंतवणूकदारांनी काय करावं? ऐका तज्ज्ञांचा सल्ला

SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price hike