मुंबई, 14 जुलै : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. गुरुवारी सकाळीही ब्रेंट क्रूड 100 डॉलरच्या खाली राहिले. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) ला विश्वास आहे की आगामी काळात इंधनाचा वापर कमी होईल, ज्यामुळे क्रूड अधिक स्वस्त होईल. कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या दरम्यान, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले, ज्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एकदा प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 99.39 डॉलर होती. WTI ची किंमत प्रति बॅरल 95.89 डॉलर आहे. Solar Generator: वीज गेली तरी चिंता नाही! परवडणाऱ्या किंमतीत मिळत आहेत ‘पोर्टेबल सोलर जनरेटर’ राज्यातील प्रमुख शहरांतील दर » मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर. » पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर » ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर » नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीट » नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर » औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर » जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर » कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर
तुम्हीही Airtelचं सिमकार्ड वापरता? बदललेल्या रिचार्ज प्लॅनची माहिती ठरेल फायदेशीर
सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. तुम्ही रोजची किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.