मुंबई, 13 जुलै : देशातील बरेच लोक त्यांच्या घरात वीज वापरण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे जनरेटर वापरतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. याशिवाय यात भरपूर पैसाही खर्च होतो. अशा परिस्थितीत जनतेच्या खिशावर अतिरिक्त ताण पडतो. आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारच्या पोर्टेबल सोलर जनरेटरबद्दल (Portable Solar Generator) सांगणार आहोत. हे जनरेटर वापरल्याने जास्त प्रदूषण होणार नाही. याशिवाय पोर्टेबल सोलर जनरेटरचा वापर केल्यास जास्त खर्चही होणार नाही. हे सौर जनरेटर पोर्टेबल आहेत. ते सहजपणे कुठेही नेले जाऊ शकतात. देशातील अनेक लोकांच्या घरात सोलर जनरेटर बसवले जात आहेत. सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला उत्तम बॅटरी लाइफ मिळते. त्यामुळं तो आपल्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया - तुम्हाला अनेक प्रकारचे सोलर जनरेटर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर आणि मार्केटमध्ये 10 ते 20 हजारांच्या किमतीत सहज मिळतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते खरेदी करू शकता. या पोर्टेबल सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला अनेक खास फिचर्स मिळत आहेत. यामध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टीम देखील मिळत आहे. हेही वाचा: ATM Alert : सावधान! मृत व्यक्तीचं एटीएम कार्ड वापरून पैसे काढता का? जावं लागेल तुरुंगात; जाणून घ्या नियम सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला इनबिल्ट बॅटरी मिळते, जी सौरऊर्जेने चार्ज केली जाते. एकदा चार्ज केल्यानंतर, तुम्ही फॅन चालवण्यासाठी, बल्ब लावण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी सौर जनरेटर वापरू शकता. याशिवाय, तुम्हाला अनेक सोलर जनरेटरमध्ये चार्जिंग पॉवर प्लग आणि यूएसबी पोर्ट देखील मिळतात. तुमचा मोबाईल फोन किंवा इतर आवश्यक गॅझेट चार्ज करण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करू शकता. पोर्टेबल सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला चांगली mAH बॅटरी मिळत आहे. तुमच्या घरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यास. अशा परिस्थितीत तुम्ही सौरऊर्जेवर चालणारे हे सौर जनरेटर खरेदी करू शकता. याद्वारे, बल्ब आणि पंखे वापरण्याव्यतिरिक्त, आपण लॅपटॉप आणि मोबाइल देखील चार्ज करू शकता. त्यामुळं तुमचे वीजबिलाचे पैसेही वाचतील आणि लाईट गेल्यानंतर होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.