जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुम्हीही Airtelचं सिमकार्ड वापरता? बदललेल्या रिचार्ज प्लॅनची माहिती ठरेल फायदेशीर

तुम्हीही Airtelचं सिमकार्ड वापरता? बदललेल्या रिचार्ज प्लॅनची माहिती ठरेल फायदेशीर

तुम्हीही Airtelचं सिमकार्ड वापरता? बदललेल्या रिचार्ज प्लॅनची माहिती ठरेल फायदेशीर

Airtel 265 Prepaid Plan : एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी वॅलिडिटी उपलब्ध होती पण ती आता 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : तुम्ही एअरटेलचं सिमकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण Airtel ने आपल्या एका रिचार्ज प्लानमध्ये बदल केला आहे. जो ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. एअरटेल रिचार्जमध्ये 28 दिवसांची दिवसांची वॅलिडिटी संपुष्टात येणार आहे. एअरटेलने आपल्या 265 रुपयांच्या प्रीपेड (Airtel Prepaid Plan) प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. आता ही योजना अधिक वॅलिडिटी आणि अनेक फायद्यांसह उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हमजे त्याच्या किंमतीत बदल करण्यात आलेला नाही. Airtel च्या 265 रुपयांच्या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी वॅलिडिटी उपलब्ध होती पण ती आता 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वॅलिडिटीव्यतिरिक्त, कंपनीने फायदे देखील वाढवले ​​आहेत. या प्लॅनमध्ये आधी 1GB डेटा दिला जात होता पण आता तो 1.5GB इतका वाढवला गेला आहे. जर तुम्ही 300 रुपयांच्या खाली योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. ITR Filing Deadline: आयकर भरण्याची अंतिम तारीख आलीये जवळ, ‘या’ मार्गांनी वाचवा Income Tax ही योजना तुम्हाला पूर्ण 30 दिवसांची वैधता देते. म्हणजेच संपूर्ण महिनाभर रिचार्ज करण्याची गरज नाही. आधी टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह प्लॅन ऑफर करत होत्या मात्र TRAI च्या आदेशानंतर आत टेलीकॉम कंपन्यांचे नियम बदलले आहेत. आता कंपन्यांना 30 दिवसांच्या वॅलिडिटीसह ग्राहकांना किमान एक प्लॅन ऑफर करावा लागेल. पैशांची गरज लगेच भागवा! आता PF खात्यातून काढू शकाल दुप्पट रक्कम, फक्त ‘हे’करा काम एअरटेलने 30 दिवसांचे प्लॅनही बाजारात आणले आहेत. काही जुन्या प्लान्स मध्येही बदल करण्यात आले आहेत. आता ग्राहकांना पुढील रिचार्ज 30 दिवसांनंतरच करावा लागणार आहे. एअरटेलने यापूर्वी 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लान देखील आणले आहेत. यामध्ये ग्राहकांना कमी पैशातही भरपूर फायदा मिळत होता. या प्लॅनची ​​किंमत 109 रुपये, 131 रुपये, रुपये 109 आणि 111 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airtel , telecom
  • First Published :
जाहिरात
जाहिरात