Home /News /money /

Petrol Diesel Prices Hike: 15 दिवसांत 13 वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Prices Hike: 15 दिवसांत 13 वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा इंधन दरवाढ केली आहे. आतापर्यंत तब्बल 9.40 पैशांनी दर वाढवले आहेत.

    नवी दिल्ली, 5 एप्रिल : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल किमतीतील वाढ (Petrol-Diesel Hike) सतत सुरू आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल किमतीत 80 पैसे प्रति लीटरची (Petrol-Diesel Price Today) वाढ झाली आहे. कंपन्या त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई होईपर्यंत इंधन दर वाढवू शकतात. तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेल दोन्हीच्या किमतीत 80 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 104.61 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 96 रुपये लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 119.67 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 104 रुपये लीटरजवळ आहे. पुण्यात आज पेट्रोल दरात 86 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोल दर 119.13 रुपये आहे. तर डिझेल 101.84 रुपये लीटर आहे. कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा इंधन दरवाढ केली आहे. आतापर्यंत तब्बल 9.40 पैशांनी दर वाढवले आहेत. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 104.61 रुपये आणि डिझेल 95.87 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 119.67 रुपये आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 110.09 रुपये आणि डिझेल 100.18 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अ‍ॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol price hike

    पुढील बातम्या