Petrol Diesel Price: पुण्यात सलग तीन दिवस पेट्रोल नव्वदीपार! मुंबईतही इंधन दराचा भडका

Petrol Diesel Price: पुण्यात सलग तीन दिवस पेट्रोल नव्वदीपार! मुंबईतही इंधन दराचा भडका

Diesel Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. ज्यानंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 91 रुपये प्रति लीटर आहेत. पुण्यात तर पेट्रोलचे दर सलग तीन दिवस नव्वदीपार आहेत.

  • Share this:

पुणे, 13 जानेेवारी: सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसांनंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) वाढवले आहे. ज्यानंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 91 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहे. 29 दिवस इंधनाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती, त्यानंतर 6 आणि 7 जानेवारीला दर वाढले होते. या दोन दिवसात पेट्रोलचे भाव (Petrol Price) 49 पैसे प्रति लीटर वाढले होते, तर डिझेल (Diesel Price) 51 पैसे प्रति लीटरने महागलं होतं. बुधवारी मुंबईत पेट्रोल (Mumbai Petrol Rates) 91.07 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल (Mumbai Disel Rates) 81.34 रुपये प्रति लीटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर  25 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. या वाढीनंतर पेट्रोल 84.45 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 74.63 रुपये प्रति लीटर झाले आहे.

(हे वाचा- खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये RD काढली असल्यास मिळेल ही सुविधा, घरबसल्या होईल काम पूर्ण)

पुण्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीबाबत बोलायचं सलग तीन दिवस पेट्रोलचे दर वाढत आहेत. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 90.75 रुपये प्रति लीटर तर डिझेल 79.80 रुपये प्रति लीटर आहेत.

अशाप्रकारे तपासता येतील पेट्रोल-डिझेलचे नवे द

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 13, 2021, 9:14 AM IST

ताज्या बातम्या