खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये RD काढली असल्यास मिळेल ही सुविधा, घरबसल्या होईल काम पूर्ण

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) एक चांगला पर्याय देत आहे. तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याबरोबरच घरबसल्या तुमच्या आरडी खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता.

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) एक चांगला पर्याय देत आहे. तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याबरोबरच घरबसल्या तुमच्या आरडी खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जानेवारी: सध्याच्या काळात तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर पोस्ट ऑफिस एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसकडून (Post Office) आरडी खात्यामध्ये ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची सुविधा दिली जात आहे. सध्या कोरोनाशी सामना करणाऱ्या (Coronavirus) देशातील लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, कारण आरडी खात्यात (Post office RD Account) पैसे भरण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं राहून, गर्दीमध्ये जाऊन हे काम करावं लागणार नाही. तुम्ही देखील पोस्टात आरडी काढली असेल कर IPPB (India Post Payments Bank) च्या अॅपच्या माध्यमातून पैसे जमा करू शकता. हे App वापरून तुम्ही आरडीचा मासिक हप्ता खात्यात पाठवू शकता. घरबसल्या कशाप्रकारे कराल हे काम? -सर्वात आधी तुम्हाला तुमच्या IPPB अकाउंटमध्ये पैसे भरावे लागतील -यानंतर DOP प्रोडक्ट्समध्ये जाऊन आरडीचा पर्याय निवडा (हे वाचा-कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी सरकार आणणार नवी फंड योजना) -याठिकाणी आरडी खाते क्रमांक आणि DOP कस्टमर आयडी भरा -त्यानंतर तुम्हाला आरडीचा इन्स्टॉलमेंट पीरियड आणि रक्कम भरावी लागेल. -पेमेंट नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) छोट्या बचत योजनांसाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही यातून चांगला रिटर्न मिळवू शकता. कोणताही व्यक्ती आपल्या नावे कितीही आरडी अकाउंट सुरू करू शकतो. यात एकच अट आहे, ती म्हणजे कोणतीही संस्था किंवा कुटुंबाच्या नावाने हे आरडी खातं सुरू करता येत नाही. दोन वृद्ध व्यक्ती एकत्र जॉइंट आरडी अकाउंट सुरू करू शकतात. आधीच एखाद्या सुरू केलेलं वैयक्तिक आरडी खात्याला जॉइंट अकाउंटमध्ये बदलता येऊ शकतं. त्याउलट जॉइंट अकाउंटला वैयक्तिक खात्यातही बदलता येऊ शकतं. (हे वाचा- आठवडाभरात गमावला 'सर्वात श्रीमंत व्यक्ती'चा मान, Elon Musk दुसऱ्या क्रमांकावर) या आरडी स्कीममध्ये कमीत-कमी 100 रुपयांची बचत करू शकता. यात यापेक्षा जास्त 10 रुपयांच्या पटीनेही बचत करू शकता. अधिकाधिक रकमेची कोणतीही मर्यादा नाही. दहाच्या पटीने कितीही मोठी रक्कम आरडी खात्यात जमा केली जाऊ शकते. पोस्टात कमीत कमी पाच वर्षांसाठी आरडी खाते उघडता येते. बँकांमध्ये हे खातं तुम्ही सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष अशा कालावधीसाठी उघडू शकता. इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिटवर 5.8 टक्के दराने व्याज दिलं जातं. नवे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. भारत सरकार आपल्या सर्व लघु बचत योजनांच्या व्याज दराची दर तीन महिन्यांनी घोषणा करतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: