Home /News /money /

Petrol Diesel Prices : कंपन्या पुन्हा वाढवू शकतात पेट्रोल-डिझेल दर? तपासा आजचा रेट

Petrol Diesel Prices : कंपन्या पुन्हा वाढवू शकतात पेट्रोल-डिझेल दर? तपासा आजचा रेट

केंद्र सरकारने महागाईपासून काहीसा दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झाली.

    नवी दिल्ली, 23 मे : केंद्र सरकारने महागाईपासून काहीसा दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झाली. परंतु बाजार विश्लेषकांनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात. ग्लोबल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव आज 113 डॉलर प्रति बॅरलजवळ पोहोचला आहे. जाणकारांनी आधीच जर कच्च्या तेलाचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास कंपन्यांना पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढवावा लागू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. केंद्राकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅटमध्ये कपात केल्यानंतर इंधन दर कमी झाला. परंतु आता पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवण्याची संधी मिळू शकते. सध्या मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे. दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - Gold Price: सोने दरात वाढ होणार की भाव घसरणार? हे 5 फॅक्टर्स ठरतील कारणीभूत

    SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या