जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पर्सनल लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं? समजून घ्या सोप्या शब्दात

पर्सनल लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं? समजून घ्या सोप्या शब्दात

पर्सनल लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं? समजून घ्या सोप्या शब्दात

पर्सनल लोन घेण्याआधी तुम्हाला या गोष्टी माहिती असायला हव्यात

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : आपल्याला काही इमर्जन्सी आली असेल आणि पैशांची खूप गरज असेल तर पर्सनल लोन हा एक पर्याय आहे. पण पर्सनल लोन घेताना तुमचा सिबिल स्‍कोअर चांगला असावा लागतो. स्कोअर चांगला असेल तर लोन लवकर मिळतं. पर्सनल लोन कोणत्याही तारणाशिवाय दिलं जातं, त्यामुळे त्याचे व्याज दर जास्त असतात. लोन लगेच मिळतं, कोणतीही सिक्युरिटी लागत नाही, त्यामुळे ते फायद्याचं ठरू शकतं. पण त्याचे काही तोटेही आहेत. पर्सनल लोन घेणं फायद्याचं आहे की तोट्याचं हे आज आपण समजून घेऊयात. या संदर्भात ‘झी न्यूज बिझनेस’ने वृत्त दिलंय. पर्सनल लोनचे फायदे - लग्न, मेडिकल इमर्जन्सी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा तुमच्याकडे कोणताही पर्याय नसतो, तेव्हा पर्सनल लोन तुमच्यासाठी मदतीचं ठरू शकतं. अशा परिस्थितीत त्याचे अनेक फायदे आहेत, ते जाणून घेऊयात. - पर्सनल लोन कोलॅटरल फ्री लोन आहे. तुम्हाला या बदल्यात कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज भासत नाही. - होम लोन, कार लोन, टू-व्हीलर लोन इत्यादी कर्जाच्या वापरावर निर्बंध आहेत, परंतु पर्सनल लोनवर असं कोणतंही बंधन नाही. तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही ते कुठेही वापरू शकता. - पर्सनल लोनची परतफेड करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ दिला जातो. यासोबत फ्लेक्झिबल रिपेमेंटचा कालावधी जोडलेला असतो. तो सामान्यपणे 12 महिने ते 60 महिन्यांच्या दरम्यान असतो. तुम्ही तुमच्या सोईनुसार हा कालावधी निवडू शकता. - तुम्ही बँकेकडून मोठी रक्कम पर्सनल लोन म्हणून घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतील.

    उच्च शिक्षण तर घ्यायचंय पण पैसे नाहीत; चिंताच नको; एज्युकेशन लोनबद्दल इथे मिळेल A-Z माहिती

    पर्सनल लोनचे तोटे 1. पैशांची खूप गरज असेल आणि कोणताही पर्याय नसेल, तेव्हाच पर्सनल लोन घ्या. कारण पर्सनल लोनचे खूप तोटे आहेत. होम लोन, कार लोनच्या तुलनेत पर्सनल लोनचे व्याज दर खूप जास्त असतात. त्यामुळे लोनची परतफेड करताना तुम्हाला जास्त ईएमआय भरावे लागतात. यामुळे तुमचं महिन्याचं बजेट बिघडू शकतं. लोन घेण्याआधी नीट विचार करा, कारण नंतर परतफेड करताना अडचणी येऊ शकतात. जेवढी फरतफेड करू शकता, तेवढंच लोन घ्या. लोन घेण्याआधी ईएमआयची माहिती घ्या. तुम्ही पर्सनल लोन ईएमआय लोन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून ऑनलाइन कॅल्क्युलेट करू शकता. 2.पर्सनल लोन घेताना इन्कम प्रूफची गरज असते. त्याशिवाय लोन मिळत नाही. दुसरीकडे गोल्ड लोन किंवा प्रॉपर्टी लोनसाठी इन्कम प्रूफची गरज नसते. कारण ते होमलोन किंवा गोल्‍ड लोनप्रमाणे कोलॅटरलच्या आधारे दिलं जातं.

    गुडन्यूज! ‘या’ मोठ्या बँकेनं गृहकर्ज केलं स्वस्त, EMI झाला कमी, फक्त ‘या’ ग्राहकांना मिळणार फायदा

    बहुतांश बँकांमध्ये पर्सनल लोनसाठी अर्ज करताना नोकरदारांचा पगार महिन्याला किमान 15 हजार रुपये असणं गरजेचं असतं. याशिवाय पर्सनल लोनमध्ये सिबिल स्कोअरही चांगला असावा लागतो. सिबिल स्कोअर चांगला नसेल तर लोन मंजूर होण्यास अडचणी येतात. 3.पर्सनल लोनमध्ये तुम्हाला प्री-पेमेंट चार्ज भरावे लागतात, पण इतर कोणतंही लोन घेताना हे चार्जेस लागत नाहीत. याशिवाय पर्सनल लोनसाठी प्रोसेसिंग फी खूप जास्त असते. गोल्ड लोनच्या तुलनेत तर खूपच जास्त असते. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी काही बँकांमध्ये जाऊन व्याजदराबद्दल पडताळणी करून घ्या.

    News18लोकमत
    News18लोकमत

    याशिवाय प्रोसेसिंग फी आणि प्री-पेमेंटबद्दल माहिती घ्या. जिथे सर्वांत स्वस्त लोन मिळेल तिथून घ्या. याशिवाय सोनं किंवा प्रॉपर्टी तारण ठेवून लोन मिळत असेल, तर तो पर्याय निवडा, कारण पर्सनल लोनच्या तुलनेत ते तुम्हाला स्वस्त पडेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात