स्त्री आणि सोनं असं एक वेगळंच नातं पूर्वीपासून आहे. त्यामुळे दिवाळीत सोनं घ्यायचच असंही काहीवेळ ठरवून घेतलं जातं. कधीकधी बायको आणि बहिणीला गिफ्ट स्वरुपातही सोन्याचे दागिने दिले जातात. आज सोन्याचे दर तसेही घसरले आहेत. तुम्ही जर तुमच्या लाडक्या बायकोसाठी किंवा बहिणीसाठी छान सोन्यातील स्वस्त पण मस्त पर्याय शोधत असाल तर तुम्ही यापैकी एका गिफ्टची निवड करू शकता.
नोज रिंग- नाकातील फुली, चमकी किंवा नोज रिंग असंही त्याला म्हणतात. यामध्ये विविध पर्याय आणि व्हरायटी पाहायला मिळते. नाकात छान फुली किंवा रिंग तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा बायकोला भेट देऊ शकता. यामध्ये खड्याची आणि सोन्याची असे दोन प्रकार येतात.
सोन्याची नथ- सोन्याची नथ ही तुम्ही बायकोला किंवा बहिणीसाठी तिच्या लग्नासाठी तिला आताच घेऊन देऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक सणांना साडीवर नथ खूप सुंदर दिसते. सोन्याची नथ म्हणजे जीव की प्राण वाटतो.
ब्रेसलेट- 18 कॅरेटमध्ये जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही चांगलं ब्रेसलेट घेऊ शकता. याशिवाय अजून बजेट वाढवलं तर 22 कॅरेट सोन्यामध्ये ब्रेसलेट घेऊ शकता.
कानातले- स्त्रीचं सौंदर्य खुलत ते तिच्या कानातल्यांनी. छोटे झुमके असूदे किंवा छान सोन्याचे कानातले खडे असूदे पण सोन्याचे कानातले परिधान करण्याचं बायको आणि बहिणीचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता हे गिफ्ट देऊन.
चेन- थोडं बजेट जास्त असेल तर तुम्ही बायको किंवा बहिणीला 18 कॅरेटमध्ये चेन करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइननुसार त्याची किंमती कमी जास्त होऊ शकते.
पेंडट- तुमच्या बहिणीकडे आधीच चेन असेल तर तुम्ही छान छोटं नाजूक पेंडंट देऊ शकता. आता पेंडंट देऊन पुढे मागे गळ्यातली चेन करू शकता.
२४ कॅरेट गोल्ड- याकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तुम्हाला वरील कोणताच पर्याय घ्यायचा नसेल तर तुम्ही सरळ 24 कॅरेट सोन्याचं नाणं अर्धा ग्रॅम किंवा एक ग्रॅमचं घेऊन देऊ शकता. पुढे मागे ते दागिन्यांसाठी वापरता येईल किंवा पुन्हा सोनाराला दिलं तर तो पैसेही तुम्हाला देईल.
गोल्ड भिशी सुरू करणं- हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या बायकोला किंवा बहिणीच्या नावाने ठरावीक रक्कम तुम्ही दर महिन्याला सोनाराकडे जमा करू शकता. वर्षभरानंतर त्यातून एक छानशी वस्तू घेऊ शकता.