जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price: सोनं आणखी स्वस्त होणार? ‘या’ दोन गोष्टींमुळं होणार ग्राहकांची चंगळ, वाचा तज्ज्ञांचं मत

Gold Price: सोनं आणखी स्वस्त होणार? ‘या’ दोन गोष्टींमुळं होणार ग्राहकांची चंगळ, वाचा तज्ज्ञांचं मत

सोनं आणखी स्वस्त होणार? ‘या’ दोन गोष्टींचा होणार किमतीवर परिणाम, वाचा तज्ज्ञांचं मत

सोनं आणखी स्वस्त होणार? ‘या’ दोन गोष्टींचा होणार किमतीवर परिणाम, वाचा तज्ज्ञांचं मत

Gold Price: कमोडिटी बाजारातील तज्ञांनी सांगितलं की, जागतिक संकेत आणि यूएस फेडच्या बैठकीचा निकाल यांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑक्टोबर: आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती नफावसुलीच्या काळातून जात आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारच्या सत्रात सोन्याचे दर 507 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरले आणि ते 50,230 रुपयांवर बंद झाले. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, तिसर्‍या तिमाहीतील अमेरिकेचा आर्थिक डेटा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला आल्यानंतर डॉलर निर्देशांकाने वृद्धी नोंदवली आहे. त्यानंतर यूएस फेड व्याजदर वाढीबाबत आपली भूमिका बदलेल अशी अटकळ बांधली जात आहे. या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली आणि डॉलर इंडेक्समध्ये खालच्या पातळीवरून चांगला परतावा आला. फेड बैठकीचा निकाल येईपर्यंत किमतीत चढ-उतार होत राहतील- मिंटच्या बातम्यांनुसार बाजारातील तज्ञांनी सांगितलं की, सोन्याच्या किमतीचा सध्याचा सपोर्ट बेस 1630 डॉलर आहे, तर मजबूत सपोर्ट बेस 1600 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे, तर एमसीएक्सवर सोन्याचा सपोर्ट बेस जवळपास 49700 ते 49,800 रुपयांदरम्यान असून 51,200 रुपये स्तरावर रेजिस्टंटचा सामना करत आहे. कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनी सांगितलं की, कमोडिटी बाजारातील तज्ञांनी सांगितलं की, जागतिक संकेत आणि यूएस फेडच्या बैठकीचा निकाल यांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होईल. यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालांपूर्वी सोनं अस्थिरतेसह चालू राहू शकतं. हेही वाचा: LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स अमेरिकेतील चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याचे भाव घसरले- रिसर्च इन आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले, “पुढील आठवड्यात यूएस फेडच्या बैठकीचा निकाल येईपर्यंत सोन्याची किंमत 1630 डॉलर्स ते 1,685 डॉलर्सच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तिसर्‍या तिमाहीत अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा चांगल्या आर्थिक आकडेवारीनंतर डॉलर निर्देशांकाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे, जे सोन्याच्या किमती घसरण्याचे मुख्य कारण आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले की, यूएस फेडच्या बैठकीचे निकाल जाहीर होईपर्यंत MCX वर सोन्याचे दर 49,700 ते 51,200 रुपयांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अल्प मुदतीच्या उच्च जोखमीच्या व्यापाऱ्यांसाठी, IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, सध्याच्या स्तरावर 50,900 स्तरावर स्टॉप लॉस राखून 50,900 रुपये प्रति 10 ग्रॅम सोने खरेदी करता येते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात