मराठी बातम्या /बातम्या /मनी /2 मिनिटांचा मोह ठरू शकतो फास, Loan चा हप्ता न भरल्यास काय घडू शकतं पाहा

2 मिनिटांचा मोह ठरू शकतो फास, Loan चा हप्ता न भरल्यास काय घडू शकतं पाहा

कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला झटपट लोन मिळत असेल तर ते कुणाला नको असतं. मात्र तुमचा दोन मिनिटांचा लोन घेण्याचा मोह चांगलाच महागात पडू शकतो.

कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला झटपट लोन मिळत असेल तर ते कुणाला नको असतं. मात्र तुमचा दोन मिनिटांचा लोन घेण्याचा मोह चांगलाच महागात पडू शकतो.

कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला झटपट लोन मिळत असेल तर ते कुणाला नको असतं. मात्र तुमचा दोन मिनिटांचा लोन घेण्याचा मोह चांगलाच महागात पडू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : महागाई एवढी वाढत आहे की गरजा पूर्ण करण्यासाठी आता लोन घ्यायची वेळ लोकांवर आली आहे. बऱ्याचदा बँकेकडून लोन घेणं कठीण होऊन जातं. हजार कागदपत्र आणि त्यानंतरही दहा खेटे घालून मिळणाऱ्या रिजेक्शनमुळे लोक सावकार, गोल्ड लोन किंवा ऑनलाईन इंन्स्टंट लोनला बळी पडत आहेत.

कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला झटपट लोन मिळत असेल तर ते कुणाला नको असतं. मात्र तुमचा दोन मिनिटांचा लोन घेण्याचा मोह चांगलाच महागात पडू शकतो. आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेचे कर्ज घेते.

अचानक पैशांची गरज असल्यास कमी कालावधीमध्ये कर्ज घेणं हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जवळपास सर्वच बँका अल्प मुदतीसाठी कर्ज देतात. कोणत्याही त्रासाशिवाय सहज उपलब्ध होणारे हे कर्ज घेणे जितके सोपे आहे तितकेच ते फेडतानाही घाम निघतो.

गोल्ड की पर्सनल कोणतं Loan सर्वात बेस्ट, EMI मध्ये किती पडतो फरक?

त्यामुळे कुठेही कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या घामाचा पैसे यामध्ये जाणार आहे. तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. वैयक्तिक कर्जासाठी कर्ज, क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज, ओव्हरड्राफ्ट आणि ब्रिज लोन इत्यादी अल्प मुदतीच्या कर्जाच्या श्रेणीत येतात.

अशा प्रकारचे कर्ज देखील असुरक्षित असतात आणि त्याची परतफेड वेळेत केली नाही तर त्याचे धोकेही मोठे असतात. 'टू मिनिट लोन'मधील जोखीम आणि तोटे नेमके काय आहेत ते आज आपण समजून घेऊ.

Airtel यूझर्सना धक्का! आता 'या' शहरांमध्ये वाढवल्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किंमती

अशाप्रकारचे कर्ज न फेडल्यास तुम्ही डिफॉल्ट लिस्टमध्ये जाऊ शकता. हे लोन खूप जोखमीचे असतात. त्यामुळे याचा एकही हप्ता चुकवून चालत नाही. एवढंच नाही तर हप्ता चुकल्यावर लागणाऱ्या दंडाची रक्कम ही खूप जास्त असते. त्यामुळे तुमचं अख्खं महिन्याचे बजेट बिघडू शकतं.

लोनसाठी अर्ज करतानाच अटी आणि नियम नीट वाचून आणि समजून घ्या. ज्यामुळे लोन फेडताना तुम्हाला त्रास होणार नाही. शॉर्ट टर्म लोनचं टेन्यूअर कमी असतं, त्यामुळे त्याचा EMI जास्त असतो. यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं कधीकधी तर भरायला पैसेही उरणार नाहीत. कर्ज आणि EMI चा बोजा खूप जास्त असतो.

First published:
top videos

    Tags: Instant loans, Loan, Money, Pay the loan