आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पैसे लागले तर अशावेळी काय करायचं हा प्रश्न पडतो. मग आपल्याला पर्सनल लोनचा पर्याय दिसतो.
2/ 9
मात्र कधीकधी पर्सनल लोन जरा जास्तच महाग पडतं. त्याऐवजी जर तुमच्याकडे सोनं किंवा सोन्याचे दागिने असतील तर तुम्ही त्यावर गोल्ड लोन घेऊ शकता.
3/ 9
गोल्ड लोन आणि पर्सनल लोनममध्ये किती अंतर आहे आणि त्याचा तुमच्या EMI वर कसा फरक पडतो ते समजून घेऊया. त्यामुळे तुम्ही लोन घेताना नक्की विचार कराल.
4/ 9
गोल्ड लोनमध्ये, सोनं तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज दिलं जातं, त्यामुळे त्यावरील व्याज दर वैयक्तिक कर्जापेक्षा खूप कमी असतो. दिलेल्या मुदतीत जर तुम्ही लोन पूर्ण केलं नाही तर तुम्हाला वॉर्निंग दिली जाते आणि त्यानंतर ते सोनं ऑक्शनमध्ये काढलं जातं.
5/ 9
सोन्याच्या सुरक्षेमुळे ज्यांचा क्रेडिट स्कोर खराब आहे अशा लोकांनाही त्याचा फायदा मिळतो.
6/ 9
वैयक्तिक कर्जासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. यासोबतच गोल्ड लोनचे पैसे अवघ्या काही तासांत मंजूर होऊन तुमच्या खात्यात येतात.
7/ 9
वैयक्तिक कर्जाच्या प्रक्रियेस काही दिवस लागू शकतात. तुमचे सोने संपूर्ण सुरक्षिततेसह बँकेत ठेवले जाते, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कर्जाची परतफेड केल्यावर तुम्हाला तुमचं सोनं परत मिळतं.
8/ 9
एचडीएफसी बँक 7.2 टक्के ते 11.35 टक्के व्याजदराने गोल्ड लोन देते. बँक कर्जाच्या रकमेच्या 1% प्रक्रिया शुल्क देखील आकारत आहे. कोटक महिंद्रा बँक 8 ते 17 टक्के व्याजदर देत आहे.
9/ 9
युनियन बँक आणि सेंट्रल बँक 8.4 टक्के वरून गोल्ड लोन देत आहे. युको बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, पंजाब अँड सिंध बँक, फेडरल बँक आणि पंजाब नॅशनल बँक 8.5 टक्के ते 9 टक्के दराने गोल्ड लोन देतात.