Home /News /money /

धुम्रपानामुळे केवळ आरोग्याबाबतच नाही तर विमा मिळण्यातही अडचणी, निवडा अशाप्रकारची योजना

धुम्रपानामुळे केवळ आरोग्याबाबतच नाही तर विमा मिळण्यातही अडचणी, निवडा अशाप्रकारची योजना

दरवर्षी भारतात लाखो नागरिकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतो. भारतातील तंबाखूचे सेवन करणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये 70 टक्के नागरिक हे प्रौढ आहेत तर 13 ते 15 टक्के प्रौढ महिलांचा यामध्ये समावेश आहे.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization WHO) रिपोर्टनुसार भारतात 12 कोटी नागरिक धुम्रपान करतात. ही आकडेवारी एकूण जागतिक आकडेवारीच्या 12 टक्के आहे. दरवर्षी भारतात लाखो नागरिकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतो. भारतातील तंबाखूचे सेवन करणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये 70 टक्के नागरिक हे प्रौढ आहेत तर 13 ते 15 टक्के प्रौढ महिलांचा यामध्ये समावेश आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, भारतातील तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या एवढी जास्त असल्यामुळे जगातील एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के लोकसंख्या कमी असूनही, भारतातील हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या 83 टक्के इतकी आहे. धुम्रपान आणि लाईफ इन्शूरन्स प्रीमियम धुम्रपानाचा प्रभाव केवळ तुमच्या शरीरावर होत नाही तर तुमच्या लाईफ इन्शूरन्सच्या पॉलिसीवर देखील होतो. अनेक लाईफ इन्शूरन्सच्या फॉर्ममध्ये धुम्रपानाचा तुमच्या इन्शूरन्स कव्हरच्या रकमेवर फरक पडत असल्याचे लिहिलेले असते. सॉफ्टवेअर इंजिनिअर, बँक कर्मचारी आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लाईफ इन्शूरन्सचा हफ्ता कमी असतो. त्या तुलनेत बांधकाम विभागात काम करणारे कर्मचारी आणि जेल प्रशासनातील व्यक्तींना हफ्ता जास्त असतो. याचबरोबर व्यसन करणारे आणि विना व्यसनी अशा प्रकारचे दोन विभाग केले जातात. अंडररायटिंगचे नियम आणि जोखमीचे काम विचारात घेतल्यास, उच्च-जोखमीची नोकरी करणाऱ्याला पण धुम्रपान न करणार्‍या व्यक्तीपेक्षा, अगदी कमी जोखमीचं काम करणाऱ्या पण धुम्रपान करणार्‍याला अधिक हफ्ता भरावा लागतो. (हे वाचा-संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं) यामध्ये धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हफ्ता जास्त का असतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मोकिंग करण्याचा व्यक्तीच्या शरीरावर मोठा परिणाम होत असल्याने त्यांना लाईफ इन्शूरन्सचा हफ्ता जास्त असतो. धुम्रपानाचा मुख्य प्रभाव हा शरीरातील फुफ्फुसांवर होत असतो. यामुळे यकृताचा कँसर, हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे लवकर मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना हफ्ता जास्त भरावा लागतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत 50 टक्के हफ्त्याची रक्कम अधिक भरावी लागते. साधारणपणे स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीला दरमहा 650 ते 850 रुपये हफ्ता अधिक भरावा लागतो. धुम्रपान करणाऱ्यासाठी काय असते इन्शूरन्सच्या हफ्त्याचे गणित तुम्ही इन्शूरन्स घेण्यासाठी गेल्यानंतर मागील एका महिन्यात तुम्ही तंबाखुचे किती सेवन केले आहे याचा देखील विचार केला जातो. यामध्ये सिगरेट, तंबाखू आणि तंबाखूजन्य इतर पदार्थांच्या सेवनाचा समावेश आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता त्यावर तुमचा इन्शूरन्स आणि त्याचा हफ्ता ठरवला जातो. त्यामुळे तुम्हाला लाईफ इन्शूरन्स घ्यायचा असेल आणि तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ती माहिती देणे आवश्यक आहे. हफ्ता कमी करण्यासाठी तुम्ही याबाबत लपवू शकत नाही. तसेच काही कंपन्या पॉलिसी घेण्याअगोदर तुमची मेडिकल टेस्ट देखील करतात. त्यामुळे तुम्ही खोटे बोलला तर देखील मेडिकल टेस्टमध्ये तुमचे खोटे पकडले जाऊ शकते. सोप्या हफ्त्यांमध्ये घ्या लाईफ इन्शूरन्स पॉलिसीबझारच्या माहितीनुसार अफॉर्डेबल प्रीमियम असणारे इन्शूरन्स घेणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. धुम्रपान आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांसाठी आणि जवळच्या व्यक्तिंच्या उज्ज्वल भविष्यासाठी आताच लाईफ इन्शूरन्स घेणे गरजेचे आहे. मोठा हफ्ता असल्याने अनेकदा धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती टर्म इन्शूरन्स घेत नाहीत. परंतु तुम्ही धुम्रपान करत असल्यास असा इन्शूरन्स प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार असून अतिशय कमी रकमेच्या हफ्त्यांमध्ये देखील तुम्ही लाईफ इन्शोरन्स घेऊ शकता. अनेकदा कंपन्या धुम्रपानामुळे इन्शूरन्स देणार नाहीत अशी भीतीही अनेकांना वाटते पण महत्त्वाच्या कंपन्या स्मोकरनाही इन्शोरन्स देतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Smoking

    पुढील बातम्या