जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Jeevan Pramaan Life Certificate| तुमच्याकडे फक्त 72 तास? घरबसल्या आजच जमा करा

Jeevan Pramaan Life Certificate| तुमच्याकडे फक्त 72 तास? घरबसल्या आजच जमा करा

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

शेवटचे तीन दिवस उरले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत तुम्ही हे काम करून घ्या नाहीतर पेन्शनचे पैसे खात्यावर येणार नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पेन्शन धारकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर पेन्शन मिळणार नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. दोन दिवस जरी बँका बंद असल्या तरी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत तुम्ही हे काम करून घ्या नाहीतर पेन्शनचे पैसे खात्यावर येणार नाहीत. पेन्शनरांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनंतर पेन्शन उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या गरजा भागविण्यास मदत होते. काय आहेत फायदे? वृद्ध लोकांना ऑफिसमध्ये जाऊन जास्त वेळ उभे राहावे लागणार नाही. जे पेन्शनर आहेत ते राहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास केवळ ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर केल्यास ज्येष्ठ पेन्शनधारकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर काय होऊ शकतं? अशा वृद्धा लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय त्यांना पेन्शन देखील मिळणार नाही. त्यांना ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. तरच पुढील महिन्यापासून त्यांना पेन्शन मिळू शकेल. त्यांच्याकडून हे प्रमाणपत्र सादर न झाल्यास त्यांची पेन्शन बंद होईल.

News18लोकमत
News18लोकमत

5 पद्धतीने तुम्ही जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट Jeevan Pramaan Portal च्या ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपलं लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतही ही सुविधा असते Doorstep Banking द्वारे तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट जमा करता येतं काही बँकांनी व्हिडीओ कॉलद्वारे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुभा दिली आहे तुम्ही बँक किंवा पोस्टात जाऊन तिथे तुमचं लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात