मुंबई, 4 एप्रिल : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी केवळ एका आर्थिक वर्षात त्यांच्या भागधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. अगदी काही पैशांमध्ये असलेल्या शेअर्सचाही यात समावेश आहे. विकास इकोटेकचा (Vikas Ecoteck) स्टॉक हा असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक आहे. या केमिकल स्टॉकने गेल्या एका वर्षात जवळपास 275 टक्के परतावा दिला आहे. दोन वर्षांत शेअरने 0.69 ते 5.30 रुपयांपर्यंत मजल मारत जवळपास 650 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना या शेअरने जवळपास 186 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत तो 1.86 रुपयांवरून 5.30 रुपयांपर्यंत वाढला. तर गेल्या एका वर्षात हा पेनी स्टॉक 1.41 रुपयांवरून 5.30 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. या कालावधीत यात सुमारे 275 टक्के वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत हा पेनी स्टॉक 0.69 रुपयांवरून आज 5.30 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, या कालावधीत या स्टॉकमध्ये 7.5 पट वाढ झाली आहे. Home Loan घेणाऱ्यांसाठी आता ‘हा’ लाभ मिळणार नाही, दीड लाखांची सूट बंद दोन वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 7.5 लाख बनली विकास इकोटेकच्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.02 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्ष 2022 च्या सुरुवातीला या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.75 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी यात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे एक लाख रुपये 2.85 लाख झाले असते. HDFC-HDFC Bank merger : HDFC खातेधारकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या विलीनीकरणाचा होईल सर्वाधिक फायदा गेल्या एका वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 3.75 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 1 लाख रुपये 7.5 लाख झाले असते. मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सध्या विकास इकोटेकच्या शेअर्सचे बाजार भांडवल सुमारे 500 कोटी रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 6.90 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक प्रति शेअर 1 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.