मुंबई, 3 एप्रिल : नवीन घर खरेदी (Home Buyers) करणाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2022 पासून दीड लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजावर अतिरिक्त कर कपातीचा (Tax Saving Benefit) लाभ मिळणार नाही. कलम 80EEA अंतर्गत उपलब्ध असलेला हा लाभ 2019 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला होता. परवडणाऱ्या घरांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता. कलम 80EEA अंतर्गत मर्यादित कालावधीचा लाभ अर्थसंकल्प 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी घोषणा केली की प्रथमच गृहखरेदी करणार्यांना परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर अतिरिक्त सवलत मिळू शकते. सुरुवातीला ही सूट केवळ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान मंजूर केलेल्या कर्जांसाठीच सूट मिळू शकत होती. त्यानंतर वित्त विधेयकांमध्ये कर्जाची मुदत 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आणि शेवटी ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता यापुढे हा कालावधी वाढवण्यात आला नाही. चांगला परतावा हवा आणि जोखीम पण नको? मग ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर कर लाभ प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 24(b) अंतर्गत उपलब्ध असलेल्या गृहकर्जाच्या व्याजावर भरलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर सूट देण्याव्यतिरिक्त आहे. या लाभाचा क्लेम करण्यासाठी आणखी एक अट ती म्हणजे घराच्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं? परवडणारे घर म्हणजे काय? (Affordable house) आयकर विभागाच्या मते दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये परवडणारे घर म्हणजे ज्याचे कार्पेट क्षेत्रफळ 645 चौरस फूट पेक्षा जास्त नाही. मेट्रो शहरांव्यतिरिक्त ही वरची मर्यादा 968 चौरस फूट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.