मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Corona vaccine घेतल्यानंतर मोदी सरकार देणार दरमाह 5000 रुपये; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम

Corona vaccine घेतल्यानंतर मोदी सरकार देणार दरमाह 5000 रुपये; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम

मोदी सरकारने कोरोना लसीकरणासाठी एक स्पर्धा (Corona vaccination competition) आयोजित केली आहे.

मोदी सरकारने कोरोना लसीकरणासाठी एक स्पर्धा (Corona vaccination competition) आयोजित केली आहे.

मोदी सरकारने कोरोना लसीकरणासाठी एक स्पर्धा (Corona vaccination competition) आयोजित केली आहे.

मुंबई, 08 एप्रिल: देशात कोरोनाची प्रकरणं पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहेत. त्यामुळे मोदी सरकारने कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) वेगही वाढवला आहे. जास्तीत जास्त लोकांचं कोरोना लसीकरण (Covid 19 vaccination) करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहीत केलं जातं आहे. शक्य त्या मार्गाने जनजागृती करण्यात येत आहे. काही नेतेमंडळी स्वत: कोरोना लस घेत आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लसीकरणाच्या बदल्यात लोकांना काही ना काही दिलं जात आहे. आता तर मोदी सरकारनेही देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे.

केंद्र सरकारच्या mygov.in  या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागेल. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्याला लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक छानशी टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल.

हे वाचा - या तारखेपासून सरकारी आणि खासगी कार्यालयात मिळणार Corona Vaccine, वाचा सविस्तर

तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर  तिथं लॉग इन करावं लागेल. तुम्हाला mygov.in लॉग इन आयडीसह, ओटीपीमार्फत किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमार्फतही लॉग इन करण्याची सुविधा आहे. तिथं तुम्हाला आवश्यक ती माहिती भरू तुमची एंट्री पाठवा. तिथं तुमचा हा फोटो आणि टॅगलाइन पाठवा.

सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. अशा 10 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना दर महिन्याला 5000 रुपये दिले जातील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Covid-19, Vaccination