मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्हीही Paytm चे शेअर्स घेतले का? तीन महिन्यात एका लाखाचे झाले 35 हजार, आता ही चूक करू नका

तुम्हीही Paytm चे शेअर्स घेतले का? तीन महिन्यात एका लाखाचे झाले 35 हजार, आता ही चूक करू नका

शेअर बाजारात (Stock Market) पेटीएमच्या (Paytm) शेअर्सची अवस्था पाहून गुंतवणूकदार (Investors) चिंतेत आहेत. पेटीएम शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नफ्याचे अंदाज चुकले असून ते अडचणीत आलेत.

शेअर बाजारात (Stock Market) पेटीएमच्या (Paytm) शेअर्सची अवस्था पाहून गुंतवणूकदार (Investors) चिंतेत आहेत. पेटीएम शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नफ्याचे अंदाज चुकले असून ते अडचणीत आलेत.

शेअर बाजारात (Stock Market) पेटीएमच्या (Paytm) शेअर्सची अवस्था पाहून गुंतवणूकदार (Investors) चिंतेत आहेत. पेटीएम शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नफ्याचे अंदाज चुकले असून ते अडचणीत आलेत.

    नवी दिल्ली, 10 मार्च : 'पेटीएम करो...' ही जाहिरात तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण शेअर बाजारातील परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. शेअर बाजारात (Stock Market) पेटीएमच्या (Paytm) शेअर्सची अवस्था पाहून गुंतवणूकदार (Investors) चिंतेत आहेत. पेटीएम शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नफ्याचे अंदाज चुकले असून ते अडचणीत आलेत. पेटीएमने अवघ्या 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 35 हजार रुपयांवर आणले आहेत.

    बुधवारी (9 मार्च 2022) एनएससी (NSC) मधील वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड (One 97 Communications Ltd - PAYT) म्हणजेच पेटीएमच्या शेअरची किंमत 749.85 रुपयांवर आली. या शेअरची ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत ठरली.

    शेअर्सच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण -

    पेटीएम आयपीओमध्ये कंपनीने शेअर्सची इश्यू किंमत 2150 रुपये ठेवली होती. पण शेअर लिस्टिंगच्या दिवशीच गदारोळ झाला, आणि शेअर्स 1950 रुपयांना लिस्ट झाले. त्यानंतर शेअर्समध्ये घसरण होत राहिली. कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले होते. परंतु हे शेअर्स त्यांच्या इश्यू किंमतीपर्यंत जाऊ शकले नाहीत. आज हे शेअर्स इश्यू किंमतीच्या जवळपास 3 पट घसरले आहेत.

    जेव्हा पेटीएमचे शेअर्स लिस्ट केले गेले, तेव्हा त्याचे मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये होते. पण शेअर घसरल्याने मार्केट कॅप अवघ्या 4 महिन्यांत 50 हजार कोटींवर आले आहे. बुधवारी (9 मार्च 2022) मार्केट कॅप 48 हजार कोटींच्या आसपास होता. पेटीएम, देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असून त्याचा सुरुवातीला खूप गाजावाजा झाला होता. पण यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

    हे वाचा - Home Loan वर 1 एप्रिलपासून 'ही' टॅक्स सूट नाही मिळणार

    पेटीएमच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसनी या शेअरचं रेटिंग आणि टारगेट कमी केलं आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंडसुद्धा मोठ्या प्रमाणात पेटीएम शेअर्स विकू लागले आहेत.

    मॅक्वेरीच्या (Macquarie) एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 'विविध कॉर्पोरेट अपडेट आणि निकालानंतर, डिस्ट्रिब्यूशन कमाई कमी राहू शकते. ब्रोकर्सने 2025-26 पर्यंत पेटीएमच्या कमाईत सरासरी 10 टक्क्यांनी घट केली आहे. पेटीएमची कमाई पुढील पाच वर्षांत 23 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज मॅक्वेरीने वर्तवला आहे, जो पूर्वी 26 टक्के होता.

    हे वाचा - Paytm चे शेअर नव्या नीच्चांकी पातळीवर, लिस्टिंगपासून 66 टक्के खाली

    हे लक्षात ठेवा -

    कंपनीच्या आयपीओ व्हॅल्युशनबाबत सर्व तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले होते. लॉस मेकिंग कंपनाीच्या आयपीओचे व्हॅल्युएशन खूप जास्त असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे पेटीएम आयपीओचे उदाहरण देत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, नवीन कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे व्हॅल्युएशन पहा. नव्या युगातील कंपनी बाजारात येत असेल आणि ती तोट्यात असेल, तर कमी प्रमाणात गुंतवणूक करा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तोट्यात चाललेल्या कंपनीत तुमच्या भांडवलाचा मोठा हिस्सा गुंतवू नका. तसेच, तज्ज्ञांनी पेटीएमच्या स्टॉकपासून सध्या दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

    शेअर बाजारात योग्य गुंतवणूक केल्यास खूप पैसा कमवता येतो. पण गुंतवणूक चुकीच्या शेअर्समध्ये झाली, तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हा धडाही यामधून गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

    First published:

    Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers