Home /News /money /

Home Loan वर 1 एप्रिलपासून 'ही' टॅक्स सूट नाही मिळणार, 31 मार्चपूर्वी घेता येईल फायदा

Home Loan वर 1 एप्रिलपासून 'ही' टॅक्स सूट नाही मिळणार, 31 मार्चपूर्वी घेता येईल फायदा

सध्या गृहकर्जाच्या व्याजावर एकूण 3.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध होती. कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.

    मुंबई, 8 मार्च : तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2022 पासून गृहकर्जावर (Home Loan) मोठी सूट मिळणार नाही. आयकर कायदा, 1960 च्या कलम 80EEA अंतर्गत, गृहकर्जावर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त कर सूट उपलब्ध होती. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ही सवलत फक्त परवडणाऱ्या घरांसाठी आहे. 31 मार्चनंतर सूट मिळणार नाही 1 एप्रिलपासून तुम्हाला गृहकर्जावर 1.5 लाख रुपयांची ही अतिरिक्त सूट मिळणार नाही कारण सरकारने हा कर सूट कालावधी वाढवला नाही. अर्थसंकल्प 2022 मध्ये, सरकारने या कर सवलतीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली नाही. यामुळे गृहकर्जावरील या सवलतीचा लाभ पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये मिळणार नाही. गृहकर्जावरील ही करसवलत आर्थिक वर्ष 2019 ते 2022 पर्यंत उपलब्ध होती. या दोन कपाती मिळत राहतील गृहकर्जावरील दोन मोठ्या कपाती पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळत राहील. हे गृहकर्जाच्या व्याजावर उपलब्ध आहे. दुसरे, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट देखील उपलब्ध राहील. ही वजावट गृहकर्जाच्या मूळ रकमेवर उपलब्ध आहे. सध्या व्याजावर एकूण साडेतीन लाखांची वजावट सध्या गृहकर्जाच्या व्याजावर एकूण 3.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध होती. कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे. याशिवाय, कलम 80EEA अंतर्गत व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त वजावट उपलब्ध होती. अशाप्रकारे, परवडणारी घरे खरेदी केल्यावर, तुम्हाला दोन्ही मिळून 3.5 लाख रुपयांची वजावट मिळेल. अतिरिक्त कपातीसाठी अटी कलम 24(बी) अंतर्गत उपलब्ध 1.5 लाखांपर्यंतच्या कपातीसाठी काही अटी होत्या. प्रथम, गृहकर्ज 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2022 दरम्यान मंजूर केले जावे. दुसरे, घराचे मुद्रांक शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तिसरे म्हणजे, घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर इतर कोणतीही घर मालमत्ता नसावी. ITR फाइलिंग वेबसाइट tax2win.in चे सीईओ अभिषेक सोनी म्हणाले, एखादी व्यक्ती 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी कलम 80EEA अंतर्गत गृह कर्जावरील कपातीचा दावा करू शकते. एकदा गृहकर्ज मंजूर झाल्यानंतर, संपूर्ण गृहकर्जाची परतफेड होईपर्यंत कोणीही या कपातीचा दावा करू शकतो, असे त्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले. आता तुम्हाला संधी त्यामुळे, जर तुम्हाला कलम 80EEO अंतर्गत 1.5 लाखाची अतिरिक्त वजावट मिळवायची असेल, तर तुम्हाला तुमचे गृहकर्ज बँक किंवा गृह वित्त कंपनीकडून 31 मार्चपूर्वी मंजूर करून घ्यावे लागेल. मुंबईस्थित गुंतवणूक आणि कर तज्ज्ञ बलवंत जैन यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले, तुम्हाला कलम 80EEA अंतर्गत येणारे घर खरेदी करायचे असल्यास, तुम्हाला मुदतीपूर्वी गृहकर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. तुम्ही नंतर वितरण करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Home Loan, Tax

    पुढील बातम्या