जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Paytm चे शेअर नव्या नीच्चांकी पातळीवर, लिस्टिंगपासून 66 टक्के खाली; तज्ज्ञांचा सल्ला काय?

Paytm चे शेअर नव्या नीच्चांकी पातळीवर, लिस्टिंगपासून 66 टक्के खाली; तज्ज्ञांचा सल्ला काय?

Paytm चे शेअर नव्या नीच्चांकी पातळीवर, लिस्टिंगपासून 66 टक्के खाली; तज्ज्ञांचा सल्ला काय?

Paytm कंपनीचा स्टॉक 2,150 रुपयांच्या इश्यू किंमतीपासून 66 टक्क्यांनी खाली आला आहे. आज पेटीएमचा स्टॉक 1.89 टक्क्यांनी घसरून 739.20 रुपयांवर आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 मार्च : Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वरील मागील सर्वकालीन नीचांका वरून 2.8 टक्क्यांनी घसरून 732.35 रुपयांवर आले. या स्तरावर, डिजिटल पेमेंट कंपनीचा स्टॉक 2,150 रुपयांच्या इश्यू किंमतीपासून 66 टक्क्यांनी खाली आला आहे. आज पेटीएमचा स्टॉक 1.89 टक्क्यांनी घसरून 739.20 रुपयांवर आला. त्याची मार्केट कॅप 50,000 कोटींवरून 47,660.04 कोटींवर आली आहे. पाच दिवसांत शेअर्स 6.86 टक्क्यांनी घसरले गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6.86 टक्क्यांनी घट झाली आहे, तर बेंचमार्क सेन्सेक्स 0.43 टक्क्यांनी घसरला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीदरम्यान बाजारावर नकारात्मक ट्रेंडचे वर्चस्व असल्याने पेटीएम स्टॉकमध्ये घसरण सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धाला 13 दिवस झाले आहेत आणि गुंतवणूकदार सतर्क आहेत. मात्र, दिवसभराच्या दबावानंतर शेवटच्या तासाभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्स 581 अंकांनी वाढून 53,424 वर, तर निफ्टी 150 अंकांच्या वाढीसह 16,013 वर बंद झाला. Women’s Day: योग्य गुंतवणूक करुन मुलींचं भविष्य करा सुरक्षित, शिक्षण आणि लग्नाचं टेन्शन राहणार नाही बहुतेक कंपन्यांचे नुकसान कोटक एएमसीचे कार्यकारी व्हीपी आणि वरिष्ठ इक्विटी फंड मॅनेजर हरीश कृष्णन यांच्या मते, हे बिझनेस दीर्घकालीन ऑप्शन इन्ट्र्युमेंटस आहेत. CNBC-TV18 शी बोलताना ते म्हणाले की, अशा काही कंपन्यांनी चांगला परतावा दिला असला, तरी त्यातील बहुतेकांना तोटाच झाला आहे. तुम्हीही अशा शेअर्सकडे गुंतवणुकीतून पाहिल्यास, तुमचा दीर्घकालीन दृष्टिकोन असला पाहिजे. कृष्णन पुढे म्हणाले की, कोटक एएमसीला यामध्ये कमी गुंतवणूक करायला आवडेल आणि पुढे कंपनी कशी परफॉर्म करेल यावर भविष्यातील धोरण ठरवले जाईल. डॉलरच्या तुलनेत रुपया 80-82 पर्यंत घसरण्याची शक्यता, असं झाल्यास काय परिणाम होईल; तज्ज्ञ काय सांगतात? या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घाई करू नका अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे प्रमुख (इक्विटी) जिनेश गोपानी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, हे क्षेत्र त्यांना आवडेल, परंतु निकालाचा डेटा आणि भांडवली वाटप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, जे त्याच्या नफ्याचा मार्ग निश्चित करेल. हे गुंतवणूक करण्यासारखे क्षेत्र आहे, परंतु तेथे कोणतीही घाई करु नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात