मुंबई, 14 मार्च : पेटीएमच्या शेअर्ससाठी ( Paytm Share) सोमवारची सुरुवात खूपच खराब झाली. पेटीएमचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 12 टक्क्यांनी घसरून 672 रुपयांवर आले. पेटीएम शेअर्सचा हा लाइफ टाइम लो आहे. याआधी शुक्रवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payements Bank) वर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. याचा परिणाम आज पेटीएमच्या शेअर्सवर दिसून येत आहे. आरबीआयने आयटी (Information Technology) ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत. आयटी ऑडिटचा अहवाल पाहिल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली जाणार आहे. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आरबीआयच्या अटी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पेटीएम पेमेंट्स बँकेने ट्वीट केले की, “प्रिय ग्राहकांनो, आम्ही तुमच्याशी असलेल्या आमच्या संबंधांना महत्त्व देतो आणि आम्ही आरबीआयच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमच्या विद्यमान ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय बँकिंग सेवा मिळत राहतील. UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय 11 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यासोबतच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिटचा अर्थ असा आहे की कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच सॉफ्टवेअर अनेक ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. Paytm ला RBI कडून झटका, पेटीएम पेमेंट्स बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर बंदी पेटीएम शेअरमध्ये सातत्याने घसरण जेव्हा पेटीएमचे शेअर्स लिस्ट केले गेले, तेव्हा त्याचे मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये होते. पण शेअर घसरल्याने मार्केट कॅप अवघ्या 4 महिन्यांत 50 हजार कोटींच्या खाली आले आहे. शु्क्रवारी (11 मार्च 2022) मार्केट कॅप 50.26 हजार कोटींवर आली आहे. पेटीएम, देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असून त्याचा सुरुवातीला खूप गाजावाजा झाला होता. पण यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.