जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Paytm शेअरमध्ये घसरण सुरुच, तज्ज्ञांच्या मते आणखी किती घसरण शक्य आहे?

Paytm शेअरमध्ये घसरण सुरुच, तज्ज्ञांच्या मते आणखी किती घसरण शक्य आहे?

Paytm शेअरमध्ये घसरण सुरुच, तज्ज्ञांच्या मते आणखी किती घसरण शक्य आहे?

येत्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते, पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी One 97 Communications च्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. सोमवारी दुपारी 12.10 वाजता, पेटीएमचे शेअर्स 2.70 टक्क्यांनी घसरून 580.90 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मात्र पेटीएमच्या गुंतवणूकदारांना अद्याप दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. येत्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते, पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. पेटीएम शेअर सातत्याने का पडत आहे? जामा वेल्थचे सीईओ राम कल्याण मेदुरी म्हणतात की, कंपनीकडे अद्याप स्पष्ट व्यवसाय मॉडेल नाही. किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीचे बिझनेस मॉडेल समजण्यास थोडा वेळ लागू शकतो. पेटीएमचे शेअर्स त्याच्या इश्यू किमतीपासून सुमारे 70 टक्क्यांनी घसरले आहेत आणि ते आणखी कमी होऊ शकतात. मेदुरी म्हणतात की गुंतवणूकदारांनी पेटीएम सारख्या इतर कोणत्याही आयपीओपासून दूर राहावे. Macquarie ने Paytm च्या शेअर्ससाठी 450 रुपये लक्ष्य किंमत ठेवली आहे. मात्र मेदुरी यांना विश्वास आहे की पेटीएमचे शेअर्स ही पातळी तोडल्यानंतरही खाली जाऊ शकतात. Reliance ची Clovia मध्ये 950 कोटींची गुंतवणूक, खरेदी केले 89 टक्के इक्विटी स्टेक मेदुरी म्हणाले की, जगभरातील मध्यवर्ती बँका आता महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. अशा स्थितीत कंपन्यांना नव्या फेरीत निधी उभारणे कठीण होणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांची गुंतवणूक विकणे भाग पडेल. स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपचे दर वाढणार; पाहा काय आहे कारण अश्नीर ग्रोव्हर यांनी काय सल्ला दिला? Bharatpe चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover), जे सामान्यत: पेटीएमवर टीका करतात, त्यांनी 17 मार्च रोजी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना पेटीएम शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करून आश्चर्यचकित केले. अश्नीर ग्रोव्हर यांनी आपल्या फॉलोअर्सना हा सल्ला अशा वेळी दिला आहे जेव्हा पेटीएमच्या स्टॉकमध्ये जोरदार घसरण सुरू आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, पेटीएमचे शेअर्स खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. त्याचे मूल्य 7 अब्ज होते. केवळ फंडातून 4.6 अब्ज डॉलर्स उभे केले गेले. कॅश इन हॅन्ड जवळपास 1,5 बिलियन डॉलर असणे आवश्यक आहे. त्यामुळे यामध्ये 600 रुपयाची मार्केट प्राईजवर दिसून येते की गेल्या 10 वर्षात 3.1 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत आणि 5.5 बिलियन डॉलर तयार झाले आहेत. हे बँकेच्या एफडी दरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे शेअर खरेदी करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात