मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Reliance Retail ची Clovia मध्ये 950 कोटी रुपयांची गुंतवणूक, खरेदी केले 89 टक्के इक्विटी स्टेक

Reliance Retail ची Clovia मध्ये 950 कोटी रुपयांची गुंतवणूक, खरेदी केले 89 टक्के इक्विटी स्टेक

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (Reliance Retail Ventures Limited) रविवारी ब्रिज-टू-प्रिमियम इंटिमेट वेअर कॅटेगरीत इंडस्ट्री लीडर असलेली कंपनी क्लोव्हियामध्ये (Clovia) 950 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 89 टक्के इक्विटी स्टेक खरेदी केल्याची घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 मार्च : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (Reliance Retail Ventures Limited) रविवारी (20 मार्च 22) ब्रिज-टू-प्रिमियम इंटिमेट वेअर कॅटेगरीत इंडस्ट्री लीडर असलेली कंपनी क्लोव्हियामध्ये (Clovia) 950 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 89 टक्के इक्विटी स्टेक खरेदी केल्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनानुसार, RRVL पर्पल पांडा फॅशन्समधील (Purple Panda Fashions) भागीदारी विकत घेणार आहे.

पर्पल पांडा या कंपनीकडे क्लोव्हियाच्या व्यवसायाची मालकी असून, तीच व्यवसायाचं संचालन करते. दरम्यान, हे व्यवहार सेकंडरी स्टेक पर्चेस आणि प्राथमिक गुंतवणुकीद्वारे (Primary Investment ) केले जातील.

या कंपनीतील उर्वरित भागीदीरी संस्थापक टीम आणि व्यवस्थापनाकडे असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

RRVL ने या पूर्वीच Zivame आणि Amante ब्रँड्स खरेदी केले आहेत. आता या कंपनीतील भागीदारी विकत घेतल्यानंतर, RRVL लाँजरी सेगमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल. कारण लाँजरीच्या तीन मोठ्या ब्रँडमध्ये त्यांची भागीदारी वाढली आहे.

2013 मध्ये क्लोव्हिया हा लाँजरी ब्रँड पंकज वर्मानी, नेहा कांत आणि सुमन चौधरी यांनी लाँच केला होता. क्लोव्हिया हा महिलांसाठी लाँजरी आणि लाउंज वेअरमध्ये भारतातील अग्रणी ब्रिज-टू-प्रीमियम D2C ब्रँड आहे. इंटिमेट वेअर स्पेसमध्ये त्याचा मजबूत कस्टमर बेस आहे आणि कंपनी ग्राहकांना चांगले डिझाइन केलेले आणि स्टाइल केलेले इनर वेअर उपलब्ध करून देते.

हे वाचा - स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपचे दर वाढणार; पाहा काय आहे कारण

या करारावर भाष्य करताना, RRVL च्या संचालक ईशा अंबानी (RRVL Director Isha Ambani) म्हणाल्या, “रिलायन्स (Reliance) नेहमीच लोकांना निवडीसाठी पर्याय वाढवण्यात आणि ग्राहकांना सर्वात चांगल्या वस्तू पुरवण्यात आघाडीवर राहिली आहे. आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टाईल, गुणवत्ता आणि उत्कृष्ट डिझाईन असलेला लाँजरी ब्रँड क्लोव्हियाचा समावेश करताना खूप खूश आहोत. या बिझनेसला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही क्लोव्हियामध्ये एका चांगल्या मजबूत टीमसोबत काम करू.”

हे वाचा - अदानींचं नाव खरेदीदारांमध्ये येताच हा स्टॉक बनला रॉकेट! तुमच्याकडे आहे का?

Clovia चे संस्थापक आणि CEO पंकज वर्मानी म्हणाले, “Clovia रिलायन्स रिटेल कुटुंबाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे. या भागीदारीद्वारे, आम्हाला रिलायन्सच्या स्केल आणि रिटेल कौशल्याचा फायदा होईल आणि ब्रँडचा विस्तार होईल. एकत्रितपणे आम्ही इंटिमेट वेअर कॅटेगरीमध्ये जागतिक दर्जाची गुणवत्ता (World Class Quality), डिझाईन (Design) आणि फॅशन रिच प्रॉडक्ट्स (Fashion Rich Products) उत्तम किमतीत ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध करून देऊ. आम्ही क्लोव्हियाला या कॅटेगरीतील सर्वात पसंतीचा आणि लोकप्रिय ब्रँड बनवण्यास उत्सुक आहोत.

First published:

Tags: Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited