लॉकडाऊनमध्ये ParleG ने मोडले विक्रीचे सारे रेकॉर्ड्स; 83 वर्षात खपली नव्हती एवढी बिस्किटं

लॉकडाऊनमध्ये ParleG ने मोडले विक्रीचे सारे रेकॉर्ड्स; 83 वर्षात खपली नव्हती एवढी बिस्किटं

1938 पासून बाजारात असलेल्या या बिस्किटांना मार्च, एप्रिल आणि मे या काळात अभूतपूर्व मागणी वाढली. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटांनी शेकडो किलोमीटर चालणाऱ्या प्रवाशांची भूक भागवली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जून : चहा- बिस्किट हा घरोघरी कुठल्याही वेळी हमखास असणारं अन्न. त्यातही पार्लेजी हे सर्वसामान्यांचं बिस्किट. गरिबांपासून सगळ्यांना वेळी अवेळी आधार देणारं. पण गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनच्या काळात पार्लेजी बिस्किटं बाजारात मिळतच नव्हती. तुटवडा निर्माण झाला होता. कारण गेल्या 80 वर्षांत झाली नाही तेवढी विक्री या बिस्किटांची लॉकडाऊनच्या काळात झाली.

1938 पासून बाजारात असलेल्या या बिस्किटांना मार्च, एप्रिल आणि मे या काळात अभूतपूर्व मागणी वाढली. मुंबईत विलेपार्ले इथे असणाऱ्या बिस्किटांच्या कारखान्यात गेल्या 8 दशकापासून बिस्किटं तयार होत आहेत. पण 82 वर्षांत झाली नव्हती एवढी बिस्किटं या काळात विकली गेल्याचं पार्ले प्रॉडक्टचे प्रमुख मयांक शाह यांनी सांगितलं. शहा यांनी नेमकी किती बिस्किटं खपली याची आकडेवारी दिलेली नसली तरी या तीन महिन्यात पार्लेजीला लक्षणीय मागणी होती. आमची वितरण व्यवस्था, साखळी त्यामुळे कोलमडली. नव्याने आम्हाला ती उभारावी लागली, असंही त्यांनी मान्य केलं.

मार्केट शेअरमध्ये आमची 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि या वाढीत 90 टक्के वाटा पार्ले जी या लोकप्रिय बिस्किटांचा आहे, असं शहा म्हणाले.

अलर्ट! 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती.

त्यात गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांची भूक भागवणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांची विक्री मोठ्या संख्येने वाढली. पार्ले-जीने गेल्या 82 वर्षातील विक्रम मोडला आहे. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटांनी शेकडो किलोमीटर चालणाऱ्या प्रवाशांची भूक भागवली आहे.

काहींनी ते स्वत: विकत घेतले आणि इतरांनी मदतीसाठी बिस्किटे वितरीत केली. बर्यानच जणांनी घरातच पार्ले-जी बिस्किटांचा साठा करुन ठेवला.

अन्य बातम्या

शेतात निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, खरीपाची पेरणी करण्याआधीच काळाचा घाला

सौंदर्य ठरलं मृत्यूचं कारण; मत्सरातून तरुणीचे केस-भुवया कापून शरीरावर केले वार

कोरोनाचा कहर, मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचं उपचारादरम्यान निधन

First published: June 9, 2020, 4:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या