शेतात निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, खरीपाची पेरणी करण्याआधीच काळाचा घाला

शेतात निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, खरीपाची पेरणी करण्याआधीच काळाचा घाला

सद्यस्थितीत खरीपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे सुरू असल्यानं अब्दुल रहीम यांचे कुटुंबीय शेतातच काम करत होते.

  • Share this:

वाशिम, 9 जून : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरून जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज कांरजा-मुर्तिजापूर मार्गावर शहा फाट्याच्या जवळ घडली आहे. अब्दुल रहीम ( 47 ) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

कारंजा येथील अब्दुल रहीम हे शेतकरी किनखेड़ा परिसरातील शेतामध्ये मोटारसायकलने जात होते. त्यावेळी वाटेत कारंजा - मूर्तिजापूर महामार्गावर शहा फाट्या नजीक असलेल्या जोड हनुमान मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जबर धडक दिली. त्यांनतर अब्दुल रहीम रस्त्यावर कोसळल्यावर त्यांच्या डोक्यावरून वाहनांचे चाक गेल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत खरीपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे सुरू असल्यानं अब्दुल रहीम यांचे कुटुंबीय शेतातच काम करत होते. ते देखील आपली गावातील कामे आटोपून शेतात जात असतांना काळाने घाला घातला. अब्दुल रहीम हे घरातील कर्ते व्यक्ती असल्यानं कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्यावरच चालत होता. मात्र त्यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांचे पश्चात पत्नी आणि 2 मुले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 9, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या