जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Pan Card: तुमच्याकडं पॅन कार्ड नाही? 'ही' 10 कामं करताना येईल अडचण

Pan Card: तुमच्याकडं पॅन कार्ड नाही? 'ही' 10 कामं करताना येईल अडचण

Pan Card: तुमच्याकडं पॅन कार्ड नाही? ही 10 कामं करताना येईल अडचण

Pan Card: तुमच्याकडं पॅन कार्ड नाही? ही 10 कामं करताना येईल अडचण

Pan Card Tips: पॅनकार्ड नसेल तर अनेक कामं रखडू शकतात. त्यामुळे तुमच्याकडं पॅन कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

**मुंबई, 24 जुलै :**तुम्ही कोणतंही सरकारी किंवा निमसरकारी काम करून घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला अनेक कागदपत्रांची गरज भासते. तुमची ओळख पटवून देण्यापासून ते कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, सिमकार्ड खरेदी करण्यापासून ते एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी तुम्हाला विविध कागदत्रांची आवश्यकता असते. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड अशी अनेक कागदपत्रं आपण सोबत बाळगतो. या कागदपत्रांप्रमाणेच तुमच्याकडे पॅन कार्ड (Pan card) असणं महत्त्वाचं आहे. ते जवळ असणं देखील खूप महत्वाचं आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, त्यांच्याकडं पॅनकार्ड नसेल तर अनेक कामं रखडू शकतात. त्यामुळे तुमच्याकडं पॅन कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 कामांबद्दल सांगणार आहोत, जी कामं तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर रखडू शकतात. पॅनकार्ड नसल्यास ही कामे रखडू शकतात (Work may get stuck without Pan Card)- 1. तुम्ही बँक खाते उघडत असाल, तर त्यावेळी तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. अन्यथा, तुमचं खाते उघडण्यात अडचण येऊ शकते. 2. जर तुम्ही बाईक, कार किंवा इतर वाहन कोणत्याही शोरूममधून खरेदी करत असाल, तर अशावेळी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. 3. ज्या संस्थेची उलाढाल 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पॅन कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. 4. जर तुम्ही असा कोणताही जीवन विमा घेत असाल, ज्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तर त्याठिकाणीही पॅन कार्ड आवश्यक आहे. हेही वाचा:  Best Business Idea: सुंदर तर प्रत्येकाला दिसायचंय! सरकारी मदत घेऊन ‘हा’ व्यवसाय करा, होईल भरपूर कमाई 5. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्ही एका वर्षात 2.5 लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक असेल. 6. जर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असाल किंवा कोणतीही सेवा घेत असाल तर त्याची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. 7. जर तुम्हाला म्युच्युअल फंड, विदेशी चलन आणि बाँड्ससह इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे. 8. जर तुम्ही असूचीबद्ध शेअर्स खरेदी करत असाल आणि त्यांचे मूल्य 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. 9. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. 10. जर तुम्ही अशी कोणतीही स्थावर मालमत्ता विकत असाल, जी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pan card
  • First Published :
जाहिरात
जाहिरात