SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधून पैसे काढायचे असतील तर आता नवे नियम असतील. बँक गैरव्यवहारातून ग्राहकांना वाचवण्यासाठी SBI आता नियम बदलणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 03:47 PM IST

SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधून पैसे काढायचे असतील तर आता नवे नियम असतील. बँक गैरव्यवहारातून ग्राहकांना वाचवण्यासाठी SBI आता नियम बदलणार आहे.

मागच्याच आठवड्यात कॅनरा बँकेनेही पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी OTP द्यावा लागेल.

SBI सुद्धा लवकरच ग्राहकांसाठी हा नियम लागू करणार आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर आधी फोनवर OTP येईल. हा OTP दिल्यानंतरच पैसे मिळू शकतील.

OTP शेअर करू नका

आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता SBI ने हे पाऊल उचललं आहे. ATM फ्रॉड रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंतच जास्त होतात.

Loading...

ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आर्थिक व्यवहार करताना OTP दिला जातो. हा OTP कुणाशीही शेअर करू नये, असा सल्लाही दिला जातो.

1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांचे हे 7 नियम, जाणून घ्या सर्व माहिती

ऑनलाइन फ्रॉड करणारे लोक OTP विचारूनच लोकांची फसवणूक करतात. लोकांच्या नकळत त्यांच्या अकाउंटमधून हजारो रुपये गायब होतात. त्यामुळेच असे कोणतेही फोनकॉल, व्हॉट्सअॅप किंवा ई मेलला उत्तरं देऊ नये. त्या व्यक्तीने बँक कर्मचारी असल्याचा दावा केला तरीही त्याला कोणतीही माहिती देऊ नये आणि OTP ही शेअर करू नये, असंही वारंवार सांगितलं जातं. बँकेचे कर्मचारी कधीच कुणालाही OTP विचारत नाहीत हे लक्षात घ्यायला हवं.

==================================================================================================

VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...