जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Oyo घरबसल्या देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी! जाणून घ्या कधी आणि कसं?

Oyo घरबसल्या देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी! जाणून घ्या कधी आणि कसं?

Oyo घरबसल्या देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी! जाणून घ्या कधी आणि कसं?

LIC आणि पतंजली पाठोपाठ आता बाजारपेठेत आणखी एक मोठा IPO येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : LIC आणि पतंजली पाठोपाठ आता बाजारपेठेत आणखी एक मोठा IPO येत आहे. तुम्हाला घरबसल्या बक्कळ पैसे कमवण्याची ही संधी आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला घरबसल्या चांगला नफा कमवण्याची संधी आहे ही संधी सोडू नका. हॉटेल कंपनी ओयो आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. या आयपीओसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. २०२३ मध्ये ओयोचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी पैसे तयार ठेवा. हे वाचा- आठवड्याची सुरुवात धीमी, 250 अंकांनी कोसळला सेन्सेक्स, हे शेअर टॉपवर गेल्या काही दिवसांपासून यावर चर्चा सुरू आहे. ओयो हॉटेल्स म्हणावी तेवढी नफ्यात चालत नसल्याने आयपीओ येणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आयपीओ येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यासाठी आता थोडी वाट पाहावी लागणार आहे. ओयोने नव्याने ड्राफ्ट तयार केला असून तो सेबीकडे देण्यात आला आहे. २०२३ च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये आयपीओ येण्याची शक्यता आहे. याआधी देखील दोन वेळा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे व्यवसायात अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळे आयपीओ आणणं शक्य झालं नाही असं ओयोचे फाऊंडर रितेश अग्रवाल यांनी सांगितलं. हे वाचा-share market : 20 स्टॉक जे तुम्हाला करतील ‘मालामाल’, तुमच्याकडे आहेत का चेक करा लिस्ट कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेअर विक्रीतून ८ हजार ४३० कोटी जमवल्याचं सेबीच्या प्राथमिक कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ओयो कंपनीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पुन्हा एकदा रुळावर येण्यात यशस्वी झाली आहे. ओयोने पहिल्या तिमाहीमध्ये आपलं पहिलं EBITDA मध्ये फायदा मिळवला आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये आयपीओबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ओयोला किती नफा होतो त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तर चौथ्या तिमाहीमध्ये ओयो आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आयपीओची किंमत किती असेल याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समोर आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात