Home /News /money /

नशीबच फळफळलं! जुनी कार विकणारे बापलेक एकाच दिवसात झाले करोडपती; कमावले तब्बल 51 हजार कोटी

नशीबच फळफळलं! जुनी कार विकणारे बापलेक एकाच दिवसात झाले करोडपती; कमावले तब्बल 51 हजार कोटी

जुनं ते सोनं म्हणतात ते खोटं नाही. याचाच प्रत्यय आला तो Carvan Co. या कंपनीच्या माध्यमातून जुन्या कार विकणाऱ्या बापलेकाला. दोघंही अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

    वॉशिंग्टन, 23 सप्टेंबर :  एखादी वस्तू सेकंड हँड घेणं, विकणं काही नवं नाही. मात्र त्या वस्तूची किंमत मूळ किमतीपेक्षाही कमी होते. त्यामुळे त्यातून फारसा नफा कमवता येईल असं नाही. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल अशाच जुन्या कार विकणारे अमेरिकेतील बापलेक एकाच दिवसात करोडपती झाले आहेत. त्यांनी तब्बल 51,471 कोटी रुपये कमवले आहेत. अमेरिकेतील कंपनी कारवान (Carvan Co.). अरनेस्ट गार्सिया-2 आणि त्यांचा मुलगा अरनेस्ट गार्सिया-3 यांची ही कंपनी जुन्या कारची ऑनलाइन विक्री करते. या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी अचानक तेजी आली आणि मग त्यांचं नशीबच फळफळलं. अरनेस्ट गार्सिया-2 यांचे वडील न्यू मेक्सिकोमध्ये दारूचं दुकान चालवायचे. अरनेस्ट गार्सिया-2 यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं होतं. मात्र नंतर त्यांनी एरिझोना युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 1991 साली त्यांनी कार भाड्याने देणारी कंपनी अग्ली डकलिंग (Ugly Duckling) खरेदी केली. ही कंपनी तोट्यात होती. अरनेस्ट गार्सिया-2 यांनी ही कंपनी खरेदी केल्यानंतर त्या माध्यमातून जुन्या कार विकायला सुरुवात केली. ही कंपनी अशा लोकांना कार विकते ज्यांना क्रेडिट स्कोर लक्षात घेता कोणती बँक कार लोन देत नाही. त्यांचा बिझनेस झपाट्याने वाढू लागला. त्यानंतर 1996 साली त्यांनी आपल्या कंपनी NASDAQ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज च्या यादीत टाकली. आपल्या कंपनीचं नाव त्यांनी Carvana Co. केलं. हे वाचा - कामगार विधेयक राज्यसभेत मंजूर; ग्रॅच्युटीबरोबरच बदलणार आणखी काही नियम सध्या कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत अमेरिकेत वापरलेल्या कारची मागणी वाढू लागली. लोकांनी जुन्या कार खरेदी केल्या आणि कंपनीचा शेअर वाढू लागला. कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी आली. कंपनीचा  शेअर 32 टक्क्यांनी वाढला आणि एकाच दिवसात कारवानने 7 अब्ज डॉलर्स कमवले.  या वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये आतापर्यत 150 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ब्लुमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) च्या मते, या बापलेकाची संपत्ती आता 1,58,825 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-3 यांची संपत्ती आता 6.21 अब्ज डॉलर्स झाली आहे, तर त्यांचे वडील अरनेस्ट गार्सिया-2 यांची संपत्ती  15 अब्ज डॉलर्स झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-2 आणि त्यांच्या मुलगा अरनेस्‍ट गार्सिया-3 अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. हे वाचा - ITR 2019-20 : कर भरायची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, या गोष्टी महत्त्वाच्या कंपनीची कमाई 2019 मध्ये दुप्पट होऊन 28,676 कोटी रुपये झाली होती. यादरम्यान कंपनीने दोन लाख जुन्या कार विकल्या. दरवर्षी 20 लाख कार विकण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Car, Money, Share market

    पुढील बातम्या