Home /News /money /

ITR 2019-20 : कर भरायची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

ITR 2019-20 : कर भरायची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे (Coronavirus) आयकर (Income tax returns) भरण्याची मुदत तीन वेळा वाढवून देण्यात आली आहे.

    मुंबई, 22 सप्टेंबर : आर्थिक वर्ष 2019-20 यासाठीचं आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. या वर्षी आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे आयकर भरण्याची मुदत तीन वेळा वाढवून देण्यात आली आहे. सामान्यपणे 31 मार्च 2020 पर्यंत गेल्या वर्षीचा आयकर भरण्याची मुदत होती. Coronavurys च्या साथीमुळे ती मुदत वाढवून पहिल्यांदा 30 जून व नंतर 31 जुलै करण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत आयकर भरणाऱ्या नागरिकांना मुभा देण्यात आली होती. 30 सप्टेंबर 20 च्या आत आयकर भरावा लागणार असून, 2019 या आर्थिक वर्षासाठी भरलेल्या विवरणपत्रात काही बदल करून ते पुन्हा भरायचं असेल तर तेही भरायची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. उशिरा कर भरणाऱ्यांना करण्यात येणाऱ्या दंडात किंवा करावरील व्याजात कोणतीही सवलत सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे लवकरात  लवकर कर भरून टाकणंच फायद्याचं आहे. काही महत्त्वाच्या शक्यता खाली देत आहोत : तुम्ही विवरणपत्र भरलंच नाहीत: तुमचा प्रलंबित ITR तुम्ही दिलेल्या मुदतीत भरला नाहीत तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. जर मुदतवाढ दिली नसेल तर आर्थिक वर्ष 2019 चा कर भरण्याची तुमची ही शेवटची संधी असू शकते. त्यामुळे दिलेल्या तारखेनंतर आयकर खातं तुम्हाला कर भरण्याची परवानगी देणार नाही. सरकारने जाहीर केलेल्या तारखेनंतर कर भरण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागेत आणि अगदी विशेष परिस्थितीतच तसं करायला आयकर विभाग परवानगी देतो. भरायचा राहिलेला कर आणि व्याजावर दंडात सवलत नाही:  जर तुम्ही 2019 या आर्थिक वर्षाचा ITR 31 ऑगस्ट 2019 या मुदतीपूर्वी भरला नसेल आणि तो 1 सप्टेंबर 19 ते 31 डिसेंबर 19 या काळात भरला तर तुम्हाला 5000 रुपये दंड ठोठावला जातो. 1 जानेवारी 20 ते 31 मार्च 20 या काळात हा ITR तुम्ही भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत आहे अशा करदात्यांनी 31 मार्चनंतर ITR भरला तर त्यांना 1000 रुपये दंड केला जातो. जर आर्थिक वर्ष 2019 चा ITR सप्टेंबरपर्यंत भरला तरीही त्यांना उशिरा ITR भरल्यामुळे 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. परताव्याला उशीर : जर तुम्हाला काही कर-परतावा मिळणार असेल तर तोही लांबण्याची शक्यता आहे कारण तुम्ही ITR भरल्यानंतरच परतावा पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते. आयकर खात्याकडून तुमच्या परताव्यावर तुम्हाला व्याज दिलं जातं जर तुम्ही मुदतीत ITR भरला नाहीत तर तुम्हाला हे परताव्यावरचं व्याज (जर तुमच्याबाबतीतल लागू होत असेल तर) मिळणार नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Income tax

    पुढील बातम्या