Home /News /money /

Business Idea: महिन्याकाठी 1 लाख रुपये कमवायची सुवर्णसंधी, फक्त 50 हजारांमध्ये सुरु करा हा व्यवसाय

Business Idea: महिन्याकाठी 1 लाख रुपये कमवायची सुवर्णसंधी, फक्त 50 हजारांमध्ये सुरु करा हा व्यवसाय

कृषी क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय करायची इच्छा असेल (How to Start Business). तर हवामानावर अवलंबून असणाऱ्या शेतीसोबत अजूनही अनेक पर्याय आहेत.

नवी दिल्ली, 03 जानेवारी: जर तुम्हाला कृषी क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय करायची इच्छा असेल (How to Start Business). तर हवामानावर अवलंबून असणाऱ्या शेतीसोबत अजूनही अनेक पर्याय आहेत. जे तुम्हाला नफ्याची हमी देतात. कुक्कुटपालन (Poultry Farming) हा यापैकीच एक व्यवसाय आहे. जर तुम्हाला छोट्या प्रमाणात कुक्कुटपालन सुरू करण्याची इच्छा असेल तर कमीत कमी 50,000 रूपये ते 1.5 लाख रूपये एवढा खर्च तुम्हाला येतो. जर तुम्ही छोट्या स्तरावर म्हणजेच 1500 कोंबड्यांच्या लेअर फार्मिंगने सुरूवात केली, तर तुम्ही दर महिन्याला 50 हजार ते 1 लाख रूपये एवढं उत्पन्न मिळवू शकता. किती गुंतवणूक जर तुम्हाला लहान प्रमाणात पोल्ट्री फार्म (Poultry Farming) सुरू करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 50,000 रूपये ते 1.5 लाख रूपये एवढा खर्च येईल. जर हा व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर जवळपास 1.5 लाख रूपये ते 3.5 लाख रूपयांदरम्यान तुम्हाला खर्च येतो. पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक आर्थिक संस्थांकडून तुम्हाला कर्ज घेता येईल. सरकारकडून मिळेल 35 टक्के अनुदान पोल्ट्री फार्मच्या व्यवसायात कर्जावर तब्बल 25 टक्के अनुदान (Subsidy) मिळते. तर SC ST वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान 35 टक्क्यांपर्यंत मिळू शकते. या व्यवसायाची विशेषता अशी आहे की, यामध्ये काही रक्कम आपल्याला गुंतवावी लागते, तर बाकीची रक्कम बँकेकडून कर्ज (Bank Loan) म्हणून मिळते. कसं कराल नियोजन उत्पन्न जरी चांगलं असलं तरी या व्यवसायात नशीब आजमावण्याआधी चांगलं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. 1500 कोंबड्यांचं लक्ष्य असेल तर त्यासाठी 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कारण अवेळी आजारापणामुळे कोंबड्या दगावण्याचा धोका असतो. अंड्यांमुळेही होते जबरदस्त कमाई देशामध्ये अंड्यांचे दरही वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील एका अंड्याचा दर हा 7 रुपये एवढा होता. मुख्य म्हणजे अंड्याच्या किंमतीसोबतच कोंबडीचे भावही वाढले आहेत. अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने चिकनबरोबरच अंड्यांतूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. कोंबड्या खरेदी करण्याचा खर्च एका लेयर पॅरेंट बर्थची किंमत जवळपास 30 ते 35 रुपये असते. परिणामी कोंबड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपयांचं बजेट ठेवावं लागेल. आता त्यांच्या पालनासाठी विविध प्रकारचं खाद्यही द्यावं लागतं आणि सोबतच औषधांचा खर्चही करावा लागतो. 20 आठवड्यांचा खर्च 3-4 लाख रुपये साधारण 20 आठवड्यांपर्यंत कोंबड्यांना खाद्य देण्याचा खर्च जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये इतका येतो. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देतात. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडी द्यायला सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात. 20 आठवड्यांनंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च जवळपास 3 ते 4 लाख रुपये इतका होतो. वर्षाला 14 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न अशाप्रकारे 1500 कोंबड्यांमुळे वर्षाला जवळपास 4,35,000 अंड्यांचं उत्पादन मिळतं. नुकसान होऊन पण 4 लाख अंडी विकता आली तर बाजार भावाप्रमाणे एक अंड 6.00 रुपये प्रमाणे दराने विकता येतं. म्हणजे वर्षभरात फक्त अंडी विकूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं. मग तुम्हीही शेतीला जोडधंदा किंवा शेतीशी निगडीत एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर कुक्कुटपालनाचा पर्याय उत्तम आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Business, Money

पुढील बातम्या