• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • दावा: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार 100 रुपये, काय आहे यामागचे सत्य

दावा: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार 100 रुपये, काय आहे यामागचे सत्य

एका मीडिया अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आता जन धन खात्यातून पैसे काढण्यासाठी 100 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. याशिवाय अन्य दोन अहवालांची पीआबी फॅक्ट चेकने पडताळणी केली आहे आणि याबाबत ट्वीट केले आहे.

 • Share this:
  नवी मुंबई, 31 ऑक्टोबर : बँक खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील तीन बातम्या ग्राहकांसाठी धक्कादायक आहे. यामध्ये पहिली बातमी अशी आहे की, सरकारी क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी शुल्क वाढवणार आहेत. दुसरी बातमी अशी आहे की, जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तिसऱ्या बातमीत असा दावा केला जात आहे की, बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) बचत खात्यात पैसे डिपॉझिट आणि विड्रॉल करण्यासाठी शुल्क वाढवले आहे. दरम्यान पीआबी फॅक्ट चेकने तीनही बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्वीट करून पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे. हे तीनही दावे पीआयबी फॅक्ट चेकने नाकारले आहेत. -पीआयबीने ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'एका मीडिया अहवालात असा दावा केला आहे की, काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. संबंधित बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही आहे.' दुसऱ्या ट्वीटमध्ये पीआयबीने असे म्हटले आहे की, 'दावा-एका मीडिया अहवालात असा दावा केला आहे की जनधन खात्यातून प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी 100 रुपये चार्ज केले जातील. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. जनधन खात्याच्या मोफत सेवांसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही आहे. याबाबत आरबीआयच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन होते.' तिसऱ्या ट्वीटमध्ये पीआयबीने असे म्हटले आहे की, 'दावा-एका मीडिया अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बँक ऑफ बडोदामध्ये बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवण्यात आले आहे. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. बँक ऑफ बडोदाने असे सूचित केले आहे की बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवले नाही आहे. ' पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते? PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: