1. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी- सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल
2. Indane ने बदलला बुकिंग क्रमांक- तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत.
4 . रेल्वेने बदलले वेळापत्रक- भारतीय रेल्वे संपूर्ण देशभरात धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक बदलणार आहे. याआधी हे वेळापत्रक 1 ऑक्टोबरपासून बदलणार होते, मात्र आता ही डेडलाइन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यानंतर 13 हजार पॅसेंजर्स आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळात बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून देशात धावणाऱ्या 30 राजधान ट्रेन्सच्या वेळा देखील बदलणार आहेत