जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अक्षय्य तृतीयेला 1 रुपयांत सोनं खरेदी करण्याची संधी! नेमकी काय आहे ऑफर?

अक्षय्य तृतीयेला 1 रुपयांत सोनं खरेदी करण्याची संधी! नेमकी काय आहे ऑफर?

डिजिटल गोल्ड

डिजिटल गोल्ड

डिजिटल गोल्ड अधिक सुरक्षित मानलं जातं. कारण ते चोरीला जाण्याचा धोका नसतो. या वर्षी तुम्ही 1 रुपयाला डिजिटल सोने खरेदी करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 एप्रिल: तुम्ही या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण सोन्याच्या किंमती सध्या गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे तुम्ही हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही डिजिटल सोन्याची निवड करू शकता. फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल सोनं अधिक सुरक्षित मानलं जातं. कारण त्यात चोरीचा धोका नसतो. या वर्षी अक्षय्य तृतीयेला तुम्ही 1 रुपयाला डिजिटल सोनं खरेदी करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

सोन्याला शुभ धातू म्हणून ओळखले जाते. बरेच लोक याला गुंतवणुकीचं बेस्ट साधन मानतात. हा आर्थिकदृष्ट्या चांगला निर्णय मानला जातो. जगभरात सोनं हा नेहमीच जगभरातील एक आवडता इन्वेस्टमेंट कंपोनेंट राहिलाय. मात्र सध्या देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यावेळी खरेदी कशी करायची, याची चिंता आपल्यापैकी अनेकांना असेल. तुमची हिच चिंता आज आपण दूर करणार आहोत.

ATM मधून कॅश काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणं गरजेचं? जाणून घ्या उत्तर

डिजिटल सोन्यात करा गुंतवणूक

यावेळी तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करून तुमची इच्छा पूर्ण करू शकता. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणं सोपं, सुरक्षित आणि फायदेशीर आहे. यासोबतच तुम्हाला फिजिकल सोन्यापासून मिळणारे सर्व अतिरिक्त फायदे देखील यामधून मिळतील. आता फक्त 1 रुपयात डिजिटल सोनं कसं खरेदी करायचं हे आपण जाणून घेऊया.

इथं 2BHK अपार्टमेंट 27 कोटीला आणि व्हिला फक्त 200 कोटींना, कुठे आहे ही सिटी, पाहा PHOTOS

डिजिटल गोल्ड कसं खरेदी करायचं

डिजिटल गोल्ड म्हणजे डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करणे. जिथे खरेदी करणारी कंपनी सोन्याची खरेदी करुन ग्राहकांसाठी सुरक्षित ठेवते. डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही फक्त 1 रुपयांची गुंतवणूकही करु शकता. बाजारानुसार खरेदी आणि विक्री करू शकता. प्रिक्योरिंग कंपनी सेफ स्टोरेज सांभाळते. भारतात डिजिटल गोल्ड ऑफर करणाऱ्या तीन प्रमुख कंपन्या आहेत. ज्या MMTC-PAMP India Pvt., Augmont Gold Ltd. आणि डिजिटल गोल्ड इंडिया प्रा. लि. या आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक डिजिटल गोल्डचे अग्रगण्य प्रदाता सेफगोल्डसह भागीदारीत DigiGold ऑफर करतात. DigiGold सह, Airtel Payments Bank चे ग्राहक Airtel Thanks अॅपद्वारे एका मिनिटात 24K सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक का करावी

-डिजिटल सोने हे गुंतवणुकीच्या सुरक्षित पद्धतींपैकी एक आहे आणि अस्थिर बाजारपेठेत स्वतःचे संरक्षण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया. -डिजिटल सोन्यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला 24 कॅरेटचे शुद्ध सोने मिळते. शुद्धता हमी प्रमाणपत्रासह हे अस्सल 24 कॅरेट सोने आहे. -डिजिटल सोन्याद्वारे, ग्राहक 1 रुपयांचीही गुंतवणूक करु शकतो. -गरज भासल्यास ग्राहक कधीही डिजिटल सोने विकू शकतात. यासोबतच ते फिजिकल गोल्डचे नाणे, बार आदींसाठी आपले डिजिटल गोल्ड एक्सचेंज करु शकता. -फिजिकल गोल्डमध्ये स्टोरेज आणि सुरक्षिततेची चिंता कायम असते. तर डिजिटल गोल्ड विक्रेताद्वारे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय विमाधारक आणि सुरक्षित वॉलेटमध्ये स्टोअर केले जाते. -डिजिटल गोल्डमध्ये, ग्राहकांना रिअल-टाइम मार्केट अपडेट्स मिळतात ज्यासाठी ते योग्य वेळी खरेदी/विक्री करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात