मुंबई, 26 ऑगस्ट : जर तुम्हीही स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी सध्या एक उत्तम संधी आहे. बांधकाम साहित्यांच्या किमती खाली आल्या आहेत. काही काळापूर्वी विक्रमी उच्चांक गाठलेल्या सिमेंट आणि बारच्या किंवा सळयांच्या किमती आता खाली आल्या आहेत. सरकारने उचललेली पावले आणि मान्सूनमुळे मागणी नसल्यामुळे ही घसरण झाली आहे. TV9 च्या बातमीनुसार, TMT बारची किरकोळ किंमत 65 हजार रुपये प्रति टन जवळ आली आहे. एप्रिलमध्ये ती 75 हजार रुपये प्रति टनाच्या जवळपास होती. बारची किरकोळ किंमत 60 रुपये प्रति टनापर्यंत खाली आली आहे, जी एप्रिलमध्ये 80 हजारांची पातळी ओलांडली होती. यादरम्यान, ब्रँडेड बारची किंमत 1 लाख रुपये प्रति टनवरून 85 हजार रुपये प्रति टनपर्यंत घसरली. एक ना दोन कमी वयात श्रीमंत होण्याचे 5 मार्ग; वयाच्या तिशीतच व्हाल लखपती
50 किलो सिमेंटच्या गोणीचा भाव 400 रुपयांपर्यंत खाली आला
सिमेंटच्या दरातही घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यात 50 किलो सिमेंटच्या पोत्याने 450 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता त्याची किंमत 400 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या काळात विटांच्या दरातही घसरण झाली आहे. टाइल्स, वाळू यासारख्या घराच्या बांधकाम साहित्याच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू सरकारने अलीकडेच स्टीलवरील निर्यात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. हे देखील बारच्या किमती कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. याशिवाय देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे बांधकाम कामांमध्ये घट झाली असून, त्यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे. मार्च-एप्रिल या काळात बारच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता. गेल्या काही दिवसांत त्यात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे, पण तरीही मार्च-एप्रिलपेक्षा स्वस्त मिळत आहे.