मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एक ना दोन कमी वयात श्रीमंत होण्याचे 5 मार्ग; वयाच्या तिशीतच व्हाल लखपती

एक ना दोन कमी वयात श्रीमंत होण्याचे 5 मार्ग; वयाच्या तिशीतच व्हाल लखपती

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

वयाच्या तिशीतच तुम्ही इतके पैसे कमवाल की लवकर निवृत्त होण्याच्या कल्पनांनाही साकार करता येईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑगस्ट : पूर्वी चाळीशीनंतर लोक गुंतवणुकीकडे वळायचे. मात्र आता चित्र उलटं आहे. लवकरातलवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास चाळीशीनंतर आरामात बसून खाणं शक्य होऊ शकतं. थेंबे थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे छोट्या छोट्या गुंतवणुकीद्वारे निवृत्तीवेळी मोठी रक्कम जमा करणं सहज शक्य आहे. त्यासाठी कमी वयातच गुंतवणूक (Early Investment) सुरु केली पाहिजे.

वयाच्या एकविसाव्या वर्षापासून नियमित गुंतवणूक सुरू केली तर लवकरच तो आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकतो. तसंच लवकर निवृत्त होण्याच्या कल्पनांनाही साकार करता येऊ शकतं. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

कमर्शिअल रिअल इस्टेट

वयाच्या तिशीनंतर (Millionaire In 30’s) श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणाऱ्या 20-29 वयोगटातल्या तरुणांसाठी व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं, असं देविका ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक अंकित अग्रवाल यांचं म्हणणं आहे. ऑफिस, वेअर हाऊस, रिटेल अशा बांधकाम प्रकल्पांमधली गुंतवणूक सुरक्षित असते. त्यांच्या मते, ग्रेड ए ऑफिस स्पेसवर 6-7 टक्के तर रिटेल युनिट्सवर 8-9 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

हे वाचा - PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू

एसआयपी

थोड्या कालावधीत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करण्यासाठी सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) अर्थात एसआयपी हा खूप चांगला पर्याय आहे. एसएजीचे व्यवस्थापकीय संचालक अमित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची गुंतवणूक 25 व्या वर्षापासून सुरु केली पाहिजे. लवकर सुरु केलेल्या व व्यवस्थित नियोजन केलेल्या एसआयपीमधून एका ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम मिळू शकते.

पीपीएफ

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ (PPF) हा गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे. यात निश्चित परताव्याची खात्री असते तसंच करसवलतीचे लाभही मिळतात. पीपीएफमधून मिळालेली रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.

क्रिप्टो अ‍ॅसेट

क्रिप्टो अ‍ॅसेटमध्ये गुंतवणुकीची इच्छा असेल व त्यात भविष्य असल्याची खात्री असेल, तर क्रिप्टोमध्येही गुंतवणूक करता येते. त्यासाठी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. क्रिप्टोकरन्सी घट असलेली घ्यावी. बाजारात सध्या घट होत असलेल्या पण चांगल्या दर्जाच्या क्रिप्टोकरन्सी घेऊ शकता. भविष्यात टिकतील व काही उद्देशानं सुरु झाल्या असतील, अशा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा.

हे वाचा - Financial Planning: नोकरी करुन कंटाळले असाल तर, योग्य आर्थिक नियोजन करुन लवकर व्हा निवृ्त्त

शेअर बाजार

महागाईची पर्वा न करता चांगला परतावा मिळवून देण्यासाठी शेअर बाजार (Stock Market) उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळेच नव्या गुंतवणूकदारांना शेअर बाजार आकर्षित करतो. यातील गुंतवणुकीमुळे अनेक जण कोट्यधीश व अब्जाधीश झाले आहेत. निफ्टी 50 ला पाहिल्यास असं लक्षात येतं की गेल्या 20 वर्षांतील याचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate) 14 टक्के आहे, असं जीएसएलचे सीईओ रवी सिंघल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा गुंतवणुकीचा पर्याय चांगला आहे.

First published:

Tags: Money, Savings and investments