मराठी बातम्या /बातम्या /मनी /

स्वस्तात घर बांधण्याची संधी; विट, सळया, सिमेंटच्या दरात घसरण

स्वस्तात घर बांधण्याची संधी; विट, सळया, सिमेंटच्या दरात घसरण

सध्या लोखंडी रॉडची किंमत विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. या कारणांमुळे, स्वप्नातील घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ बनली आहे.

सध्या लोखंडी रॉडची किंमत विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. या कारणांमुळे, स्वप्नातील घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ बनली आहे.

सध्या लोखंडी रॉडची किंमत विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. या कारणांमुळे, स्वप्नातील घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ बनली आहे.

    मुंबई, 18 जून : घर बांधण्याचा (Build a Home) काही विचार असेल तर सध्या चांगली संधी आहे. कारण बांधकामासाठी लागणारं साहित्य सध्या स्वस्त मिळत आहे. कमी मागणी, रिअल इस्टेट क्षेत्राची (Real Estate Sector) दुर्दशा आणि सरकारचा हस्तक्षेप यामुळे बांधकाम साहित्याच्या किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने खाली आल्या आहेत. सध्या लोखंडी रॉडची किंमत (Iron Rod Price) विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. या कारणांमुळे, स्वप्नातील घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ बनली आहे. हे सर्व घटक मिळून घराच्या बांधकामासाठी हीच खरी वेळ आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. दिल्लीत विटांच्या किमती घसरल्या विटांच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत त्याची किंमत हजार युनिटमागे 1-2 हजार रुपयांनी कमी झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विटांचा व्यवसाय करणाऱ्या डीबीएफ ब्रिक्स या कंपनीनुसार, दिल्लीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या 1000 विटा 5000 रुपयांना मिळत आहेत. तसेच क्रमांक दोनच्या हजार विटांची किंमत 4 हजार रुपये आणि मऊ जातीच्या हजार विटांची किंमत 4 हजार 700 रुपये झाली आहे. दुसरीकडे यूपी ब्रिक्स 5,300 रुपये प्रति हजार युनिट आणि हरियाणा विटा 5,500 रुपये प्रति हजार युनिट दराने उपलब्ध आहेत. महिनाभरापूर्वी त्यांच्या किमती किमान 6000 रुपयांच्या वर होत्या. राकेश झुनझुनवाला यांचं दोन शेअरमुळे मोठं नुकसान; शेअर बाजारातील पडझडीत 866 कोटींचा फटका सिमेंटचे भावही घसरले व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात सिमेंटचे भावही गेल्या दोन-तीन आठवड्यात 100 रुपयांनी खाली आले आहेत. बिर्ला उत्तम सिमेंटची पोती आधी 400 रुपयांना मिळत होती, आता त्याची किंमत 380 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे बिर्ला सम्राटची किंमत 440 रुपयांवरून 420 रुपये प्रति पिशवी आणि एसीसीची किंमत 450 रुपयांवरून 440 रुपयांवर आली आहे. सामान्य सिमेंटला आता 315 रुपये गोणी भाव मिळत आहे. Post Office मध्ये गुंतवणुकीचे पर्याय, पैसे सुरक्षित राहतील आणि बँकेहून अधिक परतावा मिळेल वाळूपासून ते टाइल्सही स्वस्त आजही सिमेंटचे दर सामान्यांपेक्षा जास्तच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. डिझेल-पेट्रोलच्या दरात कपात केल्यानंतर त्यात आणखी घसरण होऊ शकते. याशिवाय इतर बांधकाम साहित्याच्या किमतीतही घसरण होऊ शकते. बांधकाम साहित्याची विक्री करणाऱ्या यूपीब्रिक्स या कंपनीच्या म्हणण्यानुसार, टाईल्सची किंमत 5,200 रुपये प्रति हजार युनिटपर्यंत खाली आली आहे. सळयांची किंमत निम्मी यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये बांधकाम साहित्याच्या किमती उच्चांकावर होत्या. सळईच्या किमती आता जवळपास निम्म्या झाल्या आहेत. मार्चमध्ये काही ठिकाणी बारची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती. या आठवड्यात अनेक ठिकाणी 44 हजार रुपये प्रति टनापर्यंत खाली आली आहे. गेल्या काही महिन्यांत केवळ स्थानिकच नाही तर ब्रँडेड बारच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. सध्या ब्रँडेड बारची किंमत 80-85 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. मार्च 2022 मध्ये, ब्रँडेड बारचे दर प्रति टन 1 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Real estate

    पुढील बातम्या