नवी दिल्ली, 19 डिसेंबर: पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणली आहे.. या योजनेच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलींचं भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेमध्ये आई-वडील किंवा गार्डियन त्यांच्या मुलीच्या नावे एकच खाते उघडू शकतात. त्याचप्रमाणे दोन मुलींच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतील. पंजाब नॅशनल बँकेने या योजनेविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे.
Secure the future of your daughter, by opening #SukanyaSamriddhiAccount with PNB. To know more, visit: https://t.co/Vn1mErTc35#PNB pic.twitter.com/T3TH8Qx4aE
— Punjab National Bank (@pnbindia) December 10, 2020
या योजनेमध्ये कमीतकमी डिपॉझिट 250 रुपये तर जास्तीत जास्त डिपॉझिट 150000 रुपये आहे. Sukanya Samriddhi Account मध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळते आहे. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर सवलत देण्यात येते. याआधी या योजनेमध्ये 9.2 टक्के व्याज मिळत होते. (हे वाचा- LIC Money Back Plan: रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाख रुपयांचे मालक ) पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता. शिवाय तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कमर्शिअल बँकेच्या अधिकृत शाखेमध्ये हे खातं उघडू शकता. सुकन्या समृद्धी खातं सुरू केल्यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षानंतर तिचं लग्न होईपर्यंत चालू ठेवता येईल. जर वार्षिक 250 रुपये नाही भरले तर तुमचं खातं बंद होईल. ज्यावर्षी तुम्ही ही कमीतकमी रक्कम भरणार नाही, त्यावर्षानंतर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी रकमेबरोबर दंड म्हणून 50 रुपये द्यावे लागतली. (हे वाचा- या बँकामध्ये FD केल्यास आहे चांगला नफा कमावण्याची संधी, मिळेल 7.50% पर्यंत व्याज ) हे खातं उघडण्यासाठी आवश्यक दस्तावेज सुकन्या समृद्धी खातं उघडण्यासाठी असणारा फॉर्म, मुलीचा जन्मदाखला, आईवडील किंवा गार्डियनचे ओळखपत्र- पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ., जमाकर्ताच्या पत्त्याचा दाखला जसं की पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल इ. पैसे जमा करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंगचा देखील वापर करू शकता. खाते उघडल्यानंतर पोस्ट ऑफिस किंवा बँकेप्रमाणे तुम्हाला पासबुक दिलं जाईल.